JOIN US
मराठी बातम्या / देश / साताऱ्यातील तरुणाचा मनालीत मृत्यू, पॅराग्लायडिंगवेळी सेफ्टी बेल्ट निसटला अन्...

साताऱ्यातील तरुणाचा मनालीत मृत्यू, पॅराग्लायडिंगवेळी सेफ्टी बेल्ट निसटला अन्...

पॅराशूट पायलटने याबाबत सांगितले की, “आम्ही प्रयत्न करूनही त्याला वाचवू शकलो नाही.” आता या दुर्घटनेनंतर पॅराशूट पायलटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 26 डिसेंबर : हिमाचल प्रदेशा साताऱ्यातील तरुणाचा पॅराग्लायडिंग करताना मृत्यू झाल्याची घटना घडलीय. कुलू मनाली इथं पॅराग्लायडिंग करत असताना पॅराशूटचा बेल्ट निसटल्याने तरुण खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. मृत तरुण साताऱ्यातील शिरवळचा असून सूरज शहा असं त्याचं नाव आहे. सूरज मित्रांसोबत नाताळची सुट्टी साजरी करण्यासाठी गेला होता. याबाबत मिळालेली माहिती अशी की, शिरवळमधील सूरज शहा हा मित्रांसोबत हिमाचल प्रदेशातील कुलू मनाली इथं गेला होता. ख्रिसमस आणि न्यू इयरच्या सेलिब्रेशनसाठी ते गेले होते. तेव्हा पॅराग्लायडिंग करत असताना सूरज ८०० फुटांवरून खाली पडला. हेही वाचा :  बजेटआधी अर्थमंत्री निर्मला सीतारमण रुग्णालयात, मोठी माहिती आली समोर कुलू मनालीत पॅराग्लायडिंगचं पर्यटकांना खास आकर्षण असतं. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर पर्यटक तिथे गर्दीही करतात. पॅराग्लायडिंगसाठी सुरक्षेच्यादृष्टीने काही निकष ही लागू केले आहेत. पण सेफ्टी बेल्ट निसटल्यानं सूरजचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर आता प्रश्न उपस्थित होत आहेत. कुलू मनालीतील पॅराग्लायडिंग साइट असलेल्या डोभी इथं सूरजचा अपघात झाला. पायलटनं उड्डाण केल्यानंतर काही वेळातच सूरज खाली पडला. सूरजला रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या दुर्घटनेत पायलटसुद्धा जखमी झाला आहे. हेही वाचा :  लग्न लावून दिलं नाही म्हणून….; बोरिवलीत अल्पवयीन मुलीचा रागाच्या भरात भयानक निर्णय पॅराशूट पायलटने याबाबत सांगितले की, आम्ही प्रयत्न करूनही त्याला वाचवू शकलो नाही. सेफ्टी बेल्टची माहिती देण्यात आली होती. पण अनेकदा सांगितल्यानंतरही सूरजचा सेफ्टी बेल्टला हात लावत होता. त्यामुळे सेफ्टी बेल्ट उघडला आणि ही दुर्घटना घडली. तरीही त्याला हाताने वाचवण्याचा प्रयत्न केला, पण त्याचं वजन अधिक असल्यानं त्यात यश आलं नाही असंही पायटलने सांगितलं. आता या दुर्घटनेनंतर पॅराशूट पायलटवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या