या हत्येनंतर 22 वर्षांच्या तरुणानं 5 व्हिडीओ तयार करून मृत तरुणी त्याची प्रेयसी असल्याचे सांगत ती लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप केला.
चंदीगड पंजाबमधील बठिंडा जिल्ह्यात मनाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील कमला नेहरू कॉलनीमध्ये एक तरुणी आणि तिच्या पालकांची डोक्यात गोळी घालून ठार मारण्यात आले. या हत्येनंतर 22 वर्षांच्या तरुणानं 5 व्हिडीओ तयार करून मृत तरुणी त्याची प्रेयसी असल्याचे सांगत ती लग्नासाठी जबरदस्ती करत असल्याचा आरोप केला. (Photo: News18)
तरुणानं या व्हिडीओमध्ये, तरुणीला लग्नाचा नकार दिल्यानंतर तिने बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी दिली. म्हणूनच त्यानं तरुणी आणि तिच्या पालकांचा खून केला. यानंतर या तरुणानं आपल्या मुळ गावी जात, स्वत: लाही गोळी मारली. (Photo: News18)
चरणजितसिंग खोखर, पत्नी जसविंदर कौर आणि मुलगी सिमरन कौर अशी मृतांची नावे आहेत. चरणजित सिंह सहकारी संस्थेत सचिव होते. चरणजित सिंग यांचा मोठा मुलगा मनप्रीत सिंग इंग्लंडमध्ये राहतो. (Photo: News18)
तर, हत्या केलेल्या तरुणाचे नाव युवकरण सिंग आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण रविवारी सायंकाळी 3 वाजता आपल्या मित्रांसोबत बठिंडा येथे पोहोचला होता आणि मात्र एकटाच तरुणीच्या घरी गेला. त्यानंतर तो मानसा येथे पोहचला. त्यानंतर त्यानं व्हिडीओ शूट करत , स्वत: ला गोळी मारून आत्महत्या केली.(Photo: News18)
या व्हिडीओमध्ये मारेकऱ्याने सांगितले की त्यानं बंदूक दिल्लीत राहणाऱ्या चुलतभावाकडून आणळी होती. (Photo: News18)