JOIN US
मराठी बातम्या / देश / स्वाईन फ्लूसोबत आता Tomato Fever चा धोका वाढला, कशी घ्यायची काळजी?

स्वाईन फ्लूसोबत आता Tomato Fever चा धोका वाढला, कशी घ्यायची काळजी?

केरळ आणि ओडिशामध्ये आतापर्यंत 80 हून अधिक मुले या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, २५ ऑगस्ट : देशात कोरोना, मंकीपॉक्स आणि स्वाईन फ्लूने टेन्शन वाढवलं आहे. त्यापाठोपाठ आता टोमॅटो फ्लूनं आरोग्य विभाग आणि प्रशासनाची झोप उडवली आहे. दक्षिण भारतात टोमॅटो फिवरचा धोका वाढत आहे. महाराष्ट्रात अजूनतरी एकाही रुग्णाची नोंद करण्यात आली नाही. मात्र महाराष्ट्रा शेजारील राज्यात टोमॅटो फिवरचे रुग्ण आढळल्याने धोका आहे. केरळ आणि ओडिशामध्ये आतापर्यंत 80 हून अधिक मुले या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, केरळमधील कोल्लम जिल्ह्यात 6 मे रोजी टोमॅटो फ्लूची प्रथम ओळख झाली होती. 26 जुलैपर्यंत 82 हून अधिक मुलांमध्ये संसर्ग झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तमिळनाडू आणि कर्नाटक राज्यांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या आजाराचा धोका १० वर्षांच्या आतील मुलांना सर्वात जास्त आहे. तर या मुलांच्या संपर्कात येणाऱ्यांना आजाराचा संसर्ग होऊ शकतो असं सांगण्यात आलं आहे. काय काळजी घ्यायची? - पाणी भरपूर प्या पाणी आणि द्रव पदार्थाचं सेवन जास्त करा - मुलांच्या स्वच्छतेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. - अंगावर फोड आले असतील तर त्यांना कॉटनच्या रुमालाने हळू पुसा - संशयास्पद प्रकरणांमध्ये, अंतर ठेवा आणि डॉक्टरांचा सल्ला घ्या. - डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार बाधित मुलाची काळजी घ्या. - मुलांसाठी सर्व लसी योग्य वेळेत द्या, जेणेकरून रोगांचा धोका नाही. - ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी - सकस आहार घ्या आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या