JOIN US
मराठी बातम्या / देश / प्रेमाचा करुण अंत! कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीची दवाखान्याच्याच सहाव्या मजल्यावरून उडी

प्रेमाचा करुण अंत! कोरोनामुळं पतीचा मृत्यू झाल्यानंतर पत्नीची दवाखान्याच्याच सहाव्या मजल्यावरून उडी

कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने पत्नीने रुग्णालयातच सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते, पण पतीची तब्येत जास्त बिघडली होती.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

इंदूर, 09 मे: कोरोनामुळे देशात (Corona in India) सर्वत्र विदारक स्थिती निर्माण झाली आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण कोरोनातून बरे होत असले तरी एखाद्या ठिकाणी पूर्ण कुटुंबावर कोरोनामुळे मोठे संकट आल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शनिवारी इंदूरमध्ये (Indore Corona update) अशीच एक दुःखद घटना घडली. कोरोनामुळे पतीचे निधन झाल्याचे दुःख सहन न झाल्याने पत्नीने रुग्णालयातच सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. हे दोघेही कोरोना पॉझिटिव्ह होते, पण पतीची तब्येत जास्त बिघडली होती. पतीचा मृतदेह पाहिल्यानंतर या महिलेने सहाव्या मजल्यावर जाऊन तेथून खाली उडी मारली. या प्रकारामुळे रुग्णालयात मात्र चांगलाच गोंधळ निर्माण झाला. सहाव्या मजल्यावरून खाली पडल्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. खुशबू असे या महिलेचे नाव असून राहुल जैन असे तिच्या पतीचे नाव होते. हे दोघे येतील आशिषनगरमध्ये राहत होते. कोरोनाची लागण झाल्यानंतर ते शैल्बी रुग्णालयात दाखल झाले होते. हे वाचा -  Coronavirus Second Wave: अनेक राज्यांत कोरोना रुग्णसंख्या घटली; मात्र मृतांचा आकडा वाढताच मिळालेल्या माहितीनुसार 24 एप्रिलपासून राहुलवर या रुग्णालयात उपचार सुरू होते. शनिवारी संध्याकाळी राहुलच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर खुशबू रुग्णालयात पोहोचली. मात्र, पतीच्या मृत्यूचे दुःख ती सहन न करू शकल्याने तिनं आत्महत्या केली. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून रुग्णालयाच्याही सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हे वाचा -  भारतात पत्नीनं गळफास घेतल्यानंतर जर्मनीत पतीनं उचललं टोकाचं पाऊल, 4 महिन्याच्या संसाराला गालबोट देशातील कोरोनाची आकडेवारी दरम्यान, देशात सलग तिसऱ्या दिवशी 24 तासात चार लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासात देशात 04,01,078 रुग्णांची नोंद झाली. याअगोदर पाच मे रोजी 4.12 लाख आणि 6 मे रोजी 4.14 लाखाहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मृतांची आकडेवारी वाढतच असून देशात गेल्या 24 तासात पहिल्यांदाच 4,187 रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. दिलासादायक बाब म्हणजे 03,18,609 रुग्ण कोरोनातून बरेही झाले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या