JOIN US
मराठी बातम्या / देश / कोण आहे युसूफ अझर?

कोण आहे युसूफ अझर?

बालाकोटमध्ये भारतीय वायू दलानं केलेल्या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम देखील ठार झाल्याची शक्यता आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

दिल्ली, 26 फेब्रुवारी : बालाकोटमध्ये भारतीय वायू दलानं केलेल्या हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचा म्होरक्या अझर मसूदचा मेव्हणा युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम देखील ठार झाल्याची शक्यता आहे. कारण, बालाकोटमध्ये भारतीय हवाई दलानं केलेल्या कारवाईमध्ये जैश ए मोहम्मदसह अनेक दहशतवादी संघटनांचे लॉचिंग पॅड उद्धवस्त केले. यातील जैशच्या तळाची जबाबदारी ही युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीमकडे होती. हल्ल्यावेळी युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीम हा तळावर होता अशी माहिती आहे. त्यामुळे युसूफ अझर देखील या हल्ल्यामध्ये ठार झाल्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

‘मोदींनी 56 इंचाची छाती दाखवून दिली’, शिवसेनेकडून कौतुकाचा वर्षाव कोण आहे युसूफ अझर अझर मसूदचा मेव्हणा असलेला युसूफ अझरच्या खांद्यावर दहशतवाद्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबादारी. 1999मध्ये  कंदहार  विमान अपहरण प्रकरणामध्ये युसूफ अझरचा समावेश होता. त्यामध्ये त्याची भूमिका महत्त्वाची होती. 2000मध्ये भारतानं पाकिस्तानला दहशतवाद्यांची यादी सोपवली होती. त्यामध्ये युसूफ अझरचा देखील समावेश होता. युसूफ अझर ऊर्फ मोहम्मद सालीमविरोधात इंटरपोलनं रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. IndiaStrikeBack : परराष्ट्र सचिवांची UNCUT पत्रकार परिषद

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या