JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप, डोंगरांवरून कोसळणाऱ्या दगडांमुळे हायवे ठप्प, पाहा PHOTOs

उत्तराखंडमध्ये निसर्गाचा प्रकोप, डोंगरांवरून कोसळणाऱ्या दगडांमुळे हायवे ठप्प, पाहा PHOTOs

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) अनेक ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. ऋषिकेश-बद्रिनात हायवेवर यामुळे अनेक ठिकाणी दगड कोसळले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत आहे.

0105

उत्तराखंडमध्ये सातत्याने होणाऱ्या पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. उत्तराखंडमधील फोटो कुणाच्याही काळजाचा थरकाप उडवतील, असेच आहेत. डोंगरावरून रस्त्यावर भलेमोठे दगड कोसळत असून त्यामुळे वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे.

जाहिरात
0205

ऋषिकेश-बद्रीनाथ हायवेवर सिरोबगडजवळ झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठमोठे दगड रस्त्यावर आले. त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली. अनेक तास या हायवेवर ट्रॅफिक जॅम झालं होतं.

जाहिरात
0305

या हायवेवरील वाहनांना अख्खी रात्र रस्त्यावरच काढावी लागली. सकाळपर्यंत छोट्या मोठ्या भूस्खलनाच्या घटना घडत होत्या. सकाळी जेव्हा भूस्खलन थांबलं, तेव्हा वाहनधारकांनी सुटकेचा निश्वास सोडला. त्यानंतर वाहतूक सुरू झाली.

जाहिरात
0405

रुद्रप्रयाग जिल्ह्यातही तशीच स्थिती होती. रस्त्यावर दगड आल्यामुळे अनेक तास वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

जाहिरात
0505

उत्तराखंडमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यावर दगड कोसळल्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाल्याच्या घटना घडल्या.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या