JOIN US
मराठी बातम्या / देश / हे गाव 5 दिवसांपासून सतत खोदत आहे नदी, कारण ऐकून थक्क व्हाल

हे गाव 5 दिवसांपासून सतत खोदत आहे नदी, कारण ऐकून थक्क व्हाल

धनाचा लोभ माणसाला काय करायला लावेल सांगता येत नाही. अशीच एक घटना मध्य प्रदेशात समोर आली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 10 जानेवारी : भारतात कधी काय होईल ते सांगतात येत नाही. विश्वास बसणार नाही अशा विचित्र घटना इथं घडत असतात. अशीच एक घटना मध्य प्रदेशातून समोर आली आहे. मध्य प्रदेशातील (Madhya pradesh) राजगढ (rajgadh) या ठिकाणी सोन्याच्या नाण्यांच्या (gold coins) शोधात सगळं गाव एका नदीत खोदकाम करू लागलं. पार्वती नावाची ही नदी (parvati river) आहे. मागच्या पाच दिवसापासून सगळे लोक याच कामात गुंतलेले आहेत. राजगढ जिल्ह्याच्या शिवपुरा आणि गणूपुरा या गावांमध्ये पार्वती नदीमधून सोन्याची नाणी निघत असल्याची अफवा अशी पसरली, की लोकांनी नदीच  वेड्यासारखी खोदायला सुरू केली. एकामागे एक शेकडो लोक नदी खोदण्यात गढून गेले. विशेष म्हणजे अजून एकालाही एकही नाणं मिळालं नाही. मात्र मागच्या पाच दिवसांपासून नदी खोदण्याचं काम सतत सुरू आहे. पार्वती नदीजवळ कुरावरजवळ एका राजाची समाधी आहे. याच रस्त्यानं मुगलही गेले होते. यासंदर्भानं ग्रामस्थांना (villagers) माहिती मिळाली, की कुणालातरी नदीत 8-10 नाणी मिळाली आहेत. त्यांनी लगेचच या अफवेला (rumor) खरं मानत खोदकाम सुरू केलं. हे वाचा- अवघड आहे! दुचाकी आहे की 7 सीटर? पोलिसाने भररस्त्यात बाबांसमोर हातच जोडले शिवपुरा गाव सिहोर आणि राजगढ यांच्या सीमेवर आहे. पार्वती नदी या दोन जिल्ह्यांमधून वाहते. पाच दिवसांपूर्वी ग्रामस्थांमध्ये अफवा पसरली, की नदीतून सोन्या-चांदीची नाणी मिळत आहेत. अफवा  ऐकताच मागचा-पुढचा विचार न करता ग्रामस्थ नदी खोदू लागले. अजून तरी हाती काही लागलं नाही. मात्र आता काही काळ खोदल्यानंतर काय होईल याची उत्सुकता सगळ्यांनाच लागून राहिलेली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या