JOIN US
मराठी बातम्या / देश / VIDEO : उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस महिला नेता ढसाढसा रडू लागली; मॅडमना सांभाळण्यासाठी कार्यकर्त्यांचा गराडा

VIDEO : उमेदवारी अर्ज भरताना काँग्रेस महिला नेता ढसाढसा रडू लागली; मॅडमना सांभाळण्यासाठी कार्यकर्त्यांचा गराडा

मॅडमना रडताना पाहून काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले व त्यांची समजून काढू लागले. गुजरातमधील हा VIDEO सध्या खूप व्हायरल होत आहे

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

अहमदाबाद, 6 फेब्रुवारी : पुढील वर्षी महाराष्ट्रात महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दरम्यान गुजरातमधील अहमदाबाद येथील दरियापूर वॉर्डातून अजब प्रकार पाहायला मिळत आहे. महापालिका निवडणुकीदरम्यान उमेदवारी अर्ज भरताना महिला काँग्रेस उमेदवार आपले अश्रू थांबवू शकली नाही. आणि सर्वांसमोर ढसाढसा रडू लागली. अनेकांना महिला उमेदवाराला रडताना बघून प्रश्नच पडला. अनेकांनी तिकीट न मिळाल्याची शक्यता व्यक्त केली. मात्र सत्य लक्षात आल्यानंतर अनेकांसमोर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. त्याचं झालं असं की, गेल्या निवडणुकीदरम्यान दरियापूर वॉर्डात मोना प्रजापती निवडणूक जिंकल्या होत्या. यंदा त्यांना तिकीट तर मिळालं, मात्र वॉर्ड बदलून शाहपूर करण्यात आला. ही घटना मोना प्रजापती यांना खूप लागली. आणि सर्व कार्यकर्त्यांसमोर त्यांचा बांध कोसळला व त्या रडू लागल्या. आपल्या नेत्या रडत असल्याचं पाहून काँग्रेस कार्यकर्ते त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करीत होते.

संबंधित बातम्या

हे ही वाचा- मोठी बातमी! आता ड्रायव्हिंग लायसन्ससाठी No Test; केंद्र सरकारचा नवा प्लान काही मोठी मंडळी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करीत होत. मात्र महिला नेत्याला ही बाब खूप लागल्याचे या व्हिडिओमधून दिसत आहे. दुसरीकडे उमेदवारीचा अर्ज भरत असताना ही बाब कळाली. त्यात आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. अशावेळी त्यांच्याकडे दुसरा काहीच पर्याय हाती राहिला नाही. त्यामुळे आहे तेच स्वीकारत त्यांनी शाहपूर वॉर्डातील उमेदवारी अर्ज भरला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या