JOIN US
मराठी बातम्या / देश / उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित

उपराष्ट्रपतीपदासाठी मतदान सुरू, संध्याकाळपर्यंत निकाल अपेक्षित

निवडणुकीत मतदान करू शकतात. एनडीए खासदारांचं संख्याबळ अधिक असल्याने व्यंकय्या नायडूंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. उपराष्ट्रपतीपदाचा निकालही आजच लागणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती मिळेल.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, (प्रतिनिधी), 5 ऑगस्ट :  निवडणुकीत मतदान करू शकतात. एनडीए खासदारांचं संख्याबळ अधिक असल्याने व्यंकय्या नायडूंचा विजय जवळपास निश्चित मानला जातोय. उपराष्ट्रपतीपदाचा निकालही आजच लागणार आहे. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत देशाला नवा उपराष्ट्रपती मिळेल.उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी सकाळी 10 वाजेपासून मतदान सुरू झालंय. एनडीएकडून व्यंकय्या नायडू आणि यूपीएकडून गोपालकृष्ण गांधी हे उमेदवार आहेत. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत मतदान सुरू राहणार आहे. मतदानानंतर लगेचच निवडणुकीचा निकालही जाहीर होणार आहे. या निवडणुकीत संसदेचे सर्व खासदार मतदान करणार आहेत. दोन्ही सभागृहाचे मिळून 790 खासदार या निवडणुकीत मतदानसाठी पात्र आहेत. राष्ट्रपतीच्या निवडणुकीत एनडीएला पाठिंबा दिलेल्या बीजू जनता दल आणि नितीशकुमारांच्या जेडियूने उपराष्ट्रपतीपदासाठी मात्र युपीए उमेदवाराला पाठिंबा दर्शवलाय. विशेष म्हणजे याच नितीशकुमारांनी बिहारमध्ये मात्र, भाजपच्या पाठिंब्यावर नुकतीच सत्ता स्थापन केलीय. तरीही उपराष्ट्रपतीपदासाठी त्यांनी गोपालकृष्ण गांधी यांनाच पसंती दिलीय. या निवडणुकीतही राजकीय पक्षांना व्हिप जारी करता येत नसल्याने क्रॉस वोटिंगची शक्यता वर्तवली जातेय. मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचा कार्यकाळ 10 ऑगस्टला समाप्त होतोय. त्यानंतर नवे उपराष्ट्रपती त्यांचा कार्यभार स्वीकारतील

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या