JOIN US
मराठी बातम्या / देश / वडिलांच्या शेवटच्या इच्छेखातर 'या' बहिणींनी केलं असं काही, जाणून व्हाल थक्क

वडिलांच्या शेवटच्या इच्छेखातर 'या' बहिणींनी केलं असं काही, जाणून व्हाल थक्क

सध्या धार्मिक कारणांवरून जातीय तणाव आणि हिंदू -मुस्लिम संघर्षामुळे शांतता आणि सलोख्याचं वातावरण बिघडत असतानाच, उत्तराखंडमधल्या (Uttarakhand) दोन बहिणींनी जातीय सलोख्याचं अनोखं उदाहरण ठरल्या आहेत.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 4 मे-: सध्या धार्मिक कारणांवरून जातीय तणाव आणि हिंदू -मुस्लिम संघर्षामुळे शांतता आणि सलोख्याचं वातावरण बिघडत असतानाच, उत्तराखंडमधल्या (Uttarakhand) दोन बहिणींनी जातीय सलोख्याचं अनोखं उदाहरण ठरल्या आहेत. रमजान ईदपूर्वी या दोन हिंदू बहिणींनी ईदगाहच्या विस्तारासाठी मोठ्या प्रमाणावर जमीन (Land) दान (Donate) केली. उधमसिंहनगर जिल्ह्यातल्या काशीपूर ईदगाहसाठी 2 एकरांहून अधिक जमीन दान म्हणून देणाऱ्या या बहिणींनी आपल्या दिवगंत वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून हे पाऊल उचललं आहे. खरंतर, उत्तराखंडमध्ये ईद साधारणपणे पारंपरिक उत्साहात साजरी केली जाते. मात्र हरिद्वार जिल्ह्यातल्या भगवानपूर भागात काहीसा तणाव होता. हनुमान जयंतीदरम्यान रुरकीजवळच्या डाडा जलालपूर गावात सांप्रदायिक तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे ईदच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार जिल्ह्यात पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त ठेवला होता. या तणावापासून दूर राहत 62 वर्षाच्या अनिता आणि त्यांची 57 वर्षाची बहिण सरोज यांनी काशीपूरमध्ये जातीय सलोख्याचं उदाहरण घालून दिलं. या दोन्ही बहिणींनी घेतलेल्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे. ईदनिमित्त दोन बहिणींसाठी केली गेली प्रार्थना अनिता आणि सरोज यांनी त्यांच्या वडिलांची अखेरची इच्छा पूर्ण करण्याकरिता ईदगाहसाठी जमीन दिल्यानं मुस्लिम समाजाने (Muslim Community) त्यांचा सन्मान केला. एका वृत्तानुसार, मंगळवारी ईदच्या निमित्ताने या दोन्ही बहिणींसाठी प्रार्थना करण्यात आली. इतकंच नाही तर अनेकांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइलवर दोन्ही बहिणींचा फोटो टाकून त्यांचे आभार मानले आहेत. अशी होती वडिलांची अखेरची इच्छा काशीपूर येथील लाला बृजनंदन रस्तोगी हे शेतकरी (Farmer) होते. 2003 मध्ये वयाच्या 80 व्या वर्षी त्याचं निधन झाले. त्यांच्या मुलींना जमिनीचा वाटा मिळाला. लाला बृजनंदन रस्तोगी यांना ईदगाहसाठी जमिनीचा काही भाग देण्याची इच्छा होती. परंतु, ही गोष्ट मुलींना सांगण्यात ते कचरत होते, अशी माहिती त्यांच्या मृत्यूपश्चात काही काळानंतर मुलींना कुटुंब आणि नातेवाईकांकडून कळाली. ही बाब समजल्यानंतर मेरठमध्ये राहणाऱ्या सरोज आणि दिल्लीत राहणाऱ्या अनिता यांनी चर्चा केली आणि रविवारी जमीन देण्याबाबतच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. ईदगाहला सुपूर्द करण्यात आलेल्या 2.1 एकरपेक्षा जास्त असलेल्या जमिनीची किंमत 1.5 कोटी रुपयांहून अधिक आहे. अनिता आणि सरोज यांचा भाऊ राकेश रस्तोगी यांनी `माझ्या वडिलांचा सांप्रदायिक सलोख्यावर विश्वास होता,` असं सांगितल्याचं एका वृत्तात म्हटलं आहे. ``लाला आणि माझे वडील हे चांगले मित्र होते आणि त्यांनी आम्हा सर्वांना सांप्रदायिक सलोख्याचे धडे दिले. लाला हे खरोखरच मोठ्या मनाचे होते. लाला हयात असताना ते मोठ्या उत्साहानं दान आणि सेवा करत होते. हा भाग सांप्रदायिक सलोख्याचं केंद्र आहे,`` अशी प्रतिक्रिया ईदगाह कमिटीचे हसीन खान यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या