JOIN US
मराठी बातम्या / देश / अमेरिकेची दादागिरी! भारताला न विचारताच लक्षद्वीपजवळ युद्धनौकांचा सराव

अमेरिकेची दादागिरी! भारताला न विचारताच लक्षद्वीपजवळ युद्धनौकांचा सराव

अमेरिकेच्या नौदलाने भारताच्या परवानगी शिवाय विशेष इकोनॉमिक झोनमध्ये सराव केल्याचं समोर आलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 9 एप्रिल: अमेरिकन नौदलाने भारताच्या परवानगी शिवाय बुधवारी लक्षद्वीप बेटाजवळ भारतीय जलक्षेत्रात सराव केल्याचं समोर आलं आहे. लक्षद्वीप **(Lakshadweep)**जवळील भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रात (India’s Exclusive Economic Zone, EEZ) फ्रीडम ऑफ नेविगेशन ऑपरेशन सुरू केलं. अमेरिकन नौदलाचे हे पाऊल म्हणजे भारताच्या सागरी सुरक्षा धोरणाचे थेट उल्लंघन आहे. अशा प्रकारच्या अभियानासाठी परवानगी घेणे आवश्यक असते. अमेरिकन नौसेनेच्या सातव्या फ्लीटच्या कमांडरकडून जाहीर करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मिसाईल नाशक यूएसएस जॉन पॉल जोन्स यांच्यामार्फत सात एप्रिल रोजी हे अभियान सुरू करण्यात आले होते. लक्षद्वीपपासून 130 नॉटिकल माईल्सवर भारतीय हद्दीत अमेरिकेच्या नौदल अधिकाऱ्यांनी प्रदर्शन केले. या घटनेनंतर भारताने म्हटले की, आमच्या सागरी हद्दीत अमेरिकन सैन्याने सराव करण्यापूर्वी किंवा ये-जा करण्यापूर्वी सूचना देणे आवश्यक आहे. हे आंतरराष्ट्रीय नियमांचे सर्रास उल्लंघन आहे. यापूर्वीही अमेरिकेने असे केले आहे अभियान अमेरिकन नौदलाने केलेल्या या वक्तव्यांनंतर भारत-अमेरिकेतील तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्याच दरम्यान दक्षिण चीन समुद्रात चीनच्या दादागिरीलाही त्यांनी विरोध दर्शवला आहे. इतकेच नाही तर भारत आणि अमेरिकन नौदल गेल्या वर्षभरापासून संयुक्त अभ्यास करत आहेत. भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अमेरिकन नौसेनेने गेल्यावेळी 2019 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे अभियान केले होते. अमेरिकन काँग्रेसने जुलै 2020 मध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये सादर करण्यात आलेल्या गोपनीय अहवालात अमेरिकन नौदलाने म्हटले की, आंतरराष्ट्रीय कायद्याद्वारे सर्व देशांना प्राप्त समुद्री आणि हवाई मार्गाच्या वापराच्या हक्क आणि स्वातंत्र्याचे संरक्षण कऱण्यासाठी 1 ऑक्टोबर 2018 ते 30 सप्टेंबर 2019 दरम्यान हिंद महासागरात एका अभियानाचे आयोजन करण्यात आले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या