सावधान- आधार कार्डचं सॉफ्टवेअर झालंय हॅक, कोणीही बदलू शकतं तुमचं नाव आणि पत्ता

फक्त २,५०० रुपयांमध्ये व्हॉट्सअपवर विकले जात आहे

मुंबई, १२ सप्टेंबर- गेल्या अनेक महिन्यांपासून आधार कार्डच्या सुरक्षेबाबद वाद सुरू आहे. नुकतेच यूआयडीएआयने सांगितलं की, आधार कार्डसाठी फेस रेकग्निशन पद्धतीवर काम केलं जात आहे. दरम्यान एका रिपोर्टनुसार, आधारचे सॉफ्टवेअर हॅक करण्यात आलं आहे.हर्फिंगटनपोस्ट डॉट कॉमने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, आधार कार्डे सॉफ्टवेअर हॅक करण्यात आलं आहे. यामुळे साधारणपणे १ अब्ज भारतीयांची खासगी माहिती धोक्यात आली आहे. आधार कार्डच्या सॉफ्टवेअरमध्ये अनेक लूपहोल (गडबड) आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने हॅकर जगभरात कुठेही बसून भारतातील कोणत्याही व्यक्तीची खाजगी माहिती मिळवू शकतो, तसेच कोणत्याही नावाने आधार कार्ड बनवता येऊ शकतं, असं या रिपोर्टमध्ये स्पष्ट केलंय.या सॉफ्टवेअरची किंमत आहे फक्त २,५०० रुपये

या सर्व प्रकरणात एक गोष्ट अधिक लक्षवेधून घेते ती म्हणजे हे सॉफ्टवेअर फक्त २,५०० रुपयांमध्ये व्हॉट्सअपवर विकले जात आहे. तसेच यूट्युबवरही काही व्हिडिओ उपलब्ध आहेत, जे एका कोडमार्फत कोणाच्याही आधारकार्डच्या खाजगी माहिती बदलू शकतात आणि त्या माहितीच्या आधारे नवीन आधार कार्डही तयार करू शकतात.रिपोर्टमध्ये म्हटल्यानुसार, यूआयडीएआयने काही टेलिकॉम कंपनींना आणि अनेक खाजगी कंपनींना आधार कार्डचा अक्सेस दिला होता. याचदरम्यान, आधारचे सॉफ्टवेअर हॅक करण्यात आले. आता जगाच्या पाठी कुठेही बसून हॅकर भारतीयांची खाजगी माहिती चोरू शकतो आणि त्याचा गैरफायदा करुन घेऊ शकतो. याप्रकरणाबद्दल यूआयडीएआयने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. याप्रकऱणावर आता राजकारणही सुरू झालं आहे. काँग्रेसने हा रिपोर्ट सोशल मीडियावर शेअर केला आहे.घरबसल्या असा बदला आधार कार्डवरील फोन नंबर आणि पत्ता

Trending Now