JOIN US
मराठी बातम्या / देश / श्रीनगर: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा खात्मा

श्रीनगर: सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदच्या कमांडरचा खात्मा

क्रॉस फायरिंग दरम्यान दहशतवादी ज्या घरात लपले होते त्या घराला आग लागली. यात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 28 ऑक्टोबर : जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात मंगळवारी रात्री उशीरा सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. येथील स्थानिक पोलिसांनी याबाबत माहिती दिली. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, बडगाम जिल्ह्यातील चादौरा भागातील मोचवाह येथे दहशतवादी असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलाने घेराव घालून शोध मोहीम राबविली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला त्यानंतर दोन्ही बाजूने चकमकीला सुरुवात झाली. या कारवाईत दोन दहशतवादी ठार झाल्याची माहिती काश्मीर झोन पोलिसांनी दिली. क्रॉस फायरिंग दरम्यान दहशतवादी ज्या घरात लपले होते त्या घराला आग लागली. यात दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची ओळख जैश-ए-मोहम्मदचा कमांडर म्हणून झाली आहे.

संबंधित बातम्या

दरम्यान, अजूनही दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू आहे. दहशतवादी पळून जाऊ नयेत यासाठी सुरक्षा दलांनी जवळच्या गावातील प्रवेश आणि निर्गम ठिकाणं सील केल्याचे सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या