JOIN US
मराठी बातम्या / देश / जम्मूत एअरबेसवर दोन स्फोट, दोन संशयितांची चौकशी सुरु

जम्मूत एअरबेसवर दोन स्फोट, दोन संशयितांची चौकशी सुरु

Jammu Air Base Explosions: घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि एक्सपर्ट पोहोचलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 27 जून: जम्मू (Jammu airport) विमानतळावर दोन स्फोट झाले आहेत. विमानतळाच्या एअरफोर्स स्टेशनवर (Explosion) हे स्फोट (Blast) झाले असून घटनास्थळी फॉरेन्सिक टीम आणि एक्सपर्ट पोहोचलेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान, जम्मू हवाई दल स्थानकात आज झालेल्या घटनेसंदर्भात संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वायू-एयर चीफ एअर मार्शल एचएस अरोरा यांच्याशी बातचित केली आहे. एअर मार्शल विक्रम सिंह परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जम्मूला दाखल झाले आहेत.

5 मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Jammu air base) पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. या स्फोटात केवळ इमारतीच्या छताचं नुकसान झालं आहे. धक्कादायक म्हणजे जम्मू एअरबेसवर स्फोट घडवण्यासाठी दोन (Two drones) ड्रोनचा वापर करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. एनआयए या वृत्तसंस्थेनं या संदर्भातलं वृत्त दिलं आहे. एनआयएची टीमही जम्मू एअरपोर्टवर दाखल झाली आहे.

संबंधित बातम्या

IED टाकण्यासाठी ड्रोनचा वापर केला असून यात दोन बॅरेक्सचं नुकसान झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. पाच मिनिटात दोन स्फोट झालेत आहेत. यातला पहिला स्फोट रात्री 1:37 वाजता आणि दुसरा 1:42 वाजता झाला आहे.

जाहिरात

5 मिनिटांच्या फरकानं येथे दोन स्फोट झाल्याचे सांगण्यात येत आहे. पहिला स्फोट एका इमारतीच्या गच्चीवर झाला तर दुसरा स्फोट जमिनीवर झाला. यानंतर काही मिनिटांतच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलीस, फॉरेन्सिक टीम आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झालेत. बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडही घटनास्थळी उपस्थित आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या