श्रीनगर, 10 जानेवारी : जम्मू-काश्मीरमधील (Jammu kashmir) पुलवामामध्ये (pulwama attack) झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं प्रत्युत्तर देताना भारतीय सैन्याद्वारे 26 फेब्रुवारी नियंत्रण रेषा पार करीत पाकिस्तानमधील (Pakistan) बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मद नामक दहशतवादी संघटनेच्या प्रशिक्षण शिबिरांच्या ठिकाणांवर ‘एअर स्ट्राइक’ केला होता. (Balakot airstrike) या बाबत काल (9 जानेवारी 2021) रोजी एक बातमी समोर आली होती. न्यूज एजन्सी ANI नुसार, पाकिस्तानातील माजी राजकीय मुत्सद्दी आगा हिलालीने एका टीवी शोमध्ये 26 फेब्रुवारी 2019 रोजी बालाकोटमध्ये झालेल्या एअर स्ट्राइकमध्ये तब्बल 300 दहशतवादी मारले गेल्याचे वृत्त दिले होते. मात्र त्यासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. पाकच्या माजी मुत्सद्दींनी केलेला दावा चुकीचा असल्याचे सांगितले जात आहे. फॅक्ट चेकिंग वेबसाइट, ऑल इंडिया न्यूजनुसार हम न्यूजच्या यूट्यूब वाहिनीवर अपलोड केलेल्या ‘एजेंडा पाकिस्तान’ या कार्यक्रमाच्या डिबेटच्या व्हिडीओमध्ये हिलाले म्हणाले की, ‘भारताने जे केले ते आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्यासाठीचं अॅक्ट ऑफ वॉर होतं.’ त्यांना किमान 300 लोकांना मारायचं होतं. ऑल्ट न्यूजने पुढे लिहिलं आहे की, ट्विटरवर पोस्ट केलेला व्हिडीओ अचानक 0: 7–0: 9 सेकंदात कापला गेला. यामुळे ‘माराना’ हा शब्द ‘मारा’ असा ऐकू येत आहे. पाकिस्तानी उर्दू वाहिनीवरील चर्चेदरम्यान हिलाली बोलत होते. पाकिस्तान मुसलमान लीग-नवाज यांचे नेते अयाज सादिक यांच्या वक्तव्यानंतर माजी मुत्सद्दी यांनी हा खुलासा केला.
पाकिस्तान सरकारकडून एअर स्ट्राइकचा नकार भारताने केलेल्या एअर स्ट्राइकला पाकिस्तानच्या इम्रान खान सरकारद्वारा नेहमी नाकारलं जातं.
नेमकं काय म्हणाले पाक मुत्सद्दी भारतीय वायुसेनेच्या बालाकोट हवाई हल्ल्याची पाकिस्तानमध्ये सतत चर्चा होत आहे. आता माजी पाकिस्तानी मुत्सद्दी आगा हिलाली यांनी एका टीव्ही कार्यक्रमात आपलं मतं मांडली. आगा हिलाली म्हणाले, ‘भारताने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली आणि युद्धासारखे वागले. तिथल्या मदरशामध्ये शिकणार्या 300 मुलांना जिवे मारण्याचा हेतू होता, पण तसे झाले नाही. एका अर्थाने फुटबॉलच्या मैदानावर बॉम्ब पाडले आणि नंतर इतक्या जणांना मारल्याचा दावा केला. आमचं लक्ष्य त्याच्याहून वेगळं होतं. आमच्या निशाण्यावर त्यांचे मोठे अधिकारी होते. आम्ही उचलेले पाऊल पूर्णपणे वैध होते, कारण ती सैन्याची माणसं होती. आम्ही त्यावेळीही म्हणालो होतो की, या कारवाईत कोणीचं मारलं गेलं नाही. आताही आम्ही त्यांना सांगतो की, ते जे काही करतील तरी आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ