JOIN US
मराठी बातम्या / देश / Toolkit Case: दिशा रवीच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडीत रवानगी

Toolkit Case: दिशा रवीच्या अडचणीत वाढ; न्यायालयीन कोठडीत रवानगी

टूलकिट प्रकरणात दिशा रवीच्या (Disha Ravi) अडचणींत वाढ होताना दिसत आहे.

जाहिरात

Disha Ravi

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी: पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग (Greta Thunberg) हिने ट्विट केलेल्या टूलकिट प्रकरणात दिशा रवीच्या (Disha Ravi) अडचणींत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीच्या पातियाळा हाऊस न्यायालयाने दिशा रवी यांना 3 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Court sent judicial custody for 3 days) सुनावली आहे. आज पोलीस कोठडीचा कालावधी संपणार होता. आता तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. शेतकरी आंदोलनाशी (Farmer protest) संबंधित असणारी पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीवर टूलकिट संपादित केल्याचा गंभीर आरोप आहे. विशेष म्हणजे, दिशाच्या या अटकेवरुन कॉंग्रेससहीत (Congress) अनेक विरोधी पक्षांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने, 13 फेब्रुवारी रोजी तिच्यावर आरोप केला होता की, तिने तीन कृषी कायद्याशी संबंधित आणि शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘टूलकिट’चे संपादन केलं आहे. तसेच हे टुलकिट सोशल मीडियावर शेअर केल्याचा आरोपही तिच्यावर आहे. दिशा रवीला दिल्ली पोलिसांनी बंगळुरूमधील सोलादेवनहल्ली या तिच्या घराच्या परिसरातून अटक केली होती. तिने बंगळुरूतील एका खासगी महाविद्यालयातून बीबीए पदवी मिळविली असून ती ‘फ्रायडेज फॉर फ्यूचर इंडिया’ नावाच्या संस्थेच्या संस्थापक सदस्या आहे. हेही वाचा- Explained : 22 वर्षांच्या दिशा रवीला अटक …  5 दिवसांचा रिमांड मिळाला होता यापूर्वी, ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणात पर्यावरण कार्यकर्ती दिशा रवीला 5 दिवसांच्या पोलीस रिमांडवर पाठविण्यात आलं होतं. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने तिला बंगळूरु येथून अटक केली होती. 4 फेब्रुवारी रोजी टूलकिट संदर्भात दिल्ली पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. यावेळी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात 7 दिवसांचा रिमांड मागितला होता.  खलिस्तानी गट आणि भारत सरकारच्या विरोधात हा मोठा कट असल्याचा आरोपही यावेळी दिल्ली पोलिसांनी केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या