JOIN US
मराठी बातम्या / देश / 'Constitution preamble सुद्धा वाचलं नाहीये या माणसानं?' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांवर का संतापली रिचा चढ्ढा, VIDEO पाहा

'Constitution preamble सुद्धा वाचलं नाहीये या माणसानं?' देशाच्या परराष्ट्रमंत्र्यांवर का संतापली रिचा चढ्ढा, VIDEO पाहा

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट करुन अभिनेत्री रिचा चड्ढा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 23 एप्रिल : सध्या जातीय आणि धार्मिक द्वेषातून देश ढवळून निघत आहे. अशातच परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा एक जुना व्हिडीओ ट्विट करुन अभिनेत्री रिचा चड्ढा यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भारतात धर्मनिरपेक्षतेवरुन प्रश्न करण्यात आला होता. यावेळी भारतातील धर्मनिरपेक्षता धोक्यात नसल्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटले आहे. याचं कारण त्यांनी जे सांगितलं आहे, त्यावरुन अभिनेत्री रिचा चड्ढा संतापली आहे. ट्विटर वरील या व्हिडीओत एका महिला पत्रकार प्रश्न विचारते, की पंतप्रधान मोदी यांची भूमिका फक्त राष्ट्रवादी नाही तर मुस्लिमविरोधी आहे. तर माझा थेट प्रश्न आहे, की भारत आणि जगभरात तुम्ही इस्लाम कसा सांभळणार? त्याचवेळी आणखी एका पत्रकाराने प्रश्न केला, की आपण भारतात झालेले राजकीय बदल सांगितले. पण, त्यात एक बदल असा की त्यामुळे आम्हाला चिंता वाटते. तो म्हणजे संविधानाबद्दल असलेली प्रतिद्धता बाजूला सारुन धर्मनिरपेक्षतेला कमकुवत करणे आणि राजकीयदृष्ट्या हिंदू राष्ट्रवादाचा उदय होणे.

यावर, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर म्हणाले, की मी तुमचं विश्लेषण आणि यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांशी सहमत नाही. मी याला वेगळ्या पद्धतीने समोर ठेऊ इच्छितो. आम्ही स्वातंत्र्यांच्या 70 वर्षानंतर जे पाहिलं ते भारताच्या लोकशाहीचा परिणाम आहे. सध्या राजकीय ताकद, सामाजिक ताकद आणि काही प्रमाणात आर्थिक ताकद आतापर्यंत आमच्या देशातील मोठ्या मोठ्या शहरात होती, जिथं लोक इंग्रजी बोलत होते. जिथं त्यांना परदेशात असलेल्या सुखसुविधा मिळत होत्या. जसे माझ्यासारखे लोक, ही ताकद त्यांच्या हातातून दुसऱ्या प्रकारच्या लोकांच्या हातात गेली आहे. हे असे लोक आहेत, जे आपली मातृभाषा बोलतात आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले आहेत. माझ्या मते देशात हा बदल झाला आहे. ही लोकशाहीची जमिनीवरील ताकद आहे. त्यामुळे मला वाटत नाही की धर्मनिरपेक्षता धोक्यात आहे.

मोठी बातमी ! पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर येण्याची शक्यता

धर्मनिरपेक्षतेला घटनात्मक विश्वास नाही :  परराष्ट्रमंत्री याचं कारण म्हणजे धर्मनिरपेक्षतेचा ना कोणता कायदा आहे, ना कोणता घटनात्मक विश्वास आहे. परराष्ट्र संबंध परिषदेच्या परिषदेत बोलताना जयशंकर म्हणाले की, धर्मनिरपेक्षता हा भारतीय समाजाच्या मूल्यांमध्ये आहे आणि तो कधीही बदलला नाही. केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले की जर समाज धर्मनिरपेक्ष नसेल तर कोणतीही घटनात्मक तरतूद याची खात्री करू शकणार नाही. काय म्हणाली रिचा चड्ढा? हा व्हिडीओ पाहून अभिनेत्री रिचा चड्ढा चांगलीच संतापलेली दिसते. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचं उत्तर ऐकून या या व्यक्तीने राज्यघटनेची प्रस्तावनाही वाचली नाही का? असा तिखट प्रश्न तिने ट्विटरवरुन विचारला आहे. या ट्विटखाली तिला समर्थन आणि विरोध करणाऱ्या दोन्ही प्रकारच्या कमेंट पाहायला मिळत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या