JOIN US
मराठी बातम्या / देश / शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनी देशातल्या 250 गावात केला होता प्रयोग; किती वाढलं उत्पन्न?

शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारनी देशातल्या 250 गावात केला होता प्रयोग; किती वाढलं उत्पन्न?

या उपक्रमात 20 राज्‍यांतील 250 गांवांतील 50 हजार शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 28 जानेवारी : देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवावं यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी केंद्रानी ‘द फार्मर फर्स्‍ट’ (The farmer first) या उपक्रमाअंतर्गत देशातील शेतकऱ्यांना शेती आणि शेतीशी संबंधित पोल्ट्री, डेअरी या व्यवसायांमध्ये तज्ज्ञांनी मदत केली होती. महाराष्ट्रातील शेतकरी सविता नालकर यांनी वर्षात 9.85 लाख रुपयांचा नफा कमवला आहे. उत्तराखंडमधील भाज्यांच्या उत्पादनात 233 टक्के वाढ झाली असून, गुजरातमधील शेतकऱ्याची 167 टक्के वाढ झाली आहे. द फार्मर फर्स्‍ट ‘The Farmer First’ प्रोग्राम भारतीय कृषि अनुसंधान परिषदेने (Indian Council of Agricultural Research पूसा) सुरू केला होता. यात 20 राज्‍यांतील 250 गांवांतील 50 हजार शेतकऱ्यांचा (Farmers) समावेश आहे. तज्ज्ञांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाली. त्याच्याआधारे  पूसाने शेतकऱ्यांचं उत्पन्न आणि मिळकत यातील वाढीचा अहवाल सादर केला आहे. हे ही वाचा- BREAKING : आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानं सुरू करण्याबाबत केंद्राची मोठी घोषणा जाणून घेऊया कोणत्या राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात किती वाढ झाली महाराष्ट्र- अहमदनगर जिल्ह्यातील दोन गावांतील 750 शेतकऱ्यांच्या 477 हेक्टरवरील शेतीसाठी या तज्ज्ञांनी मदत केली. चिंचव्हरे गावातील शेतकरी सविता वैभव नालकर यांनी फळबाग आणि डेअरी उत्पादनांतून 2.5 हेक्टर जमिनीतून एका वर्षात अंदाजे 9.85 लाख रुपये नफा कमवला. उत्तराखंड- प्रोग्राममध्ये नैनीताल, देहरादून जिल्ह्यांतील 26 गांवांतील 1038 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. जवळजवळ 100 टक्के पोल्ट्री फार्ममधील आर्थिक कमाई वाढली. 251 हेक्टरांवर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे भाज्यांचं उत्पादन वाढून कमाई 233 टक्के झाली. गुजरात- अम्रेली, नवसारी जिल्ह्यांतील 7 गावांतील 4280 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला इथं शेतकऱ्यांच्या मिळकतीत अंदाजे 167 टक्के वाढ झाली. जम्मू-कश्‍मीर- सांबा जिल्ह्यातील 12 गावांतील एकूण 778 शेतकऱ्यांनी उपक्रमात सहभाग घेतला. 713 हेक्टरांवर  आधुनिक पद्धतीने शेती केल्याने शेतकरऱ्यांच्या मिळकतीत 100 टक्के वाढ झाली. राजस्थान- जोधपूर, टोंक जिल्ह्यांतील 10 गावांतील 2092 शेतकऱ्यांनी 3517 हेक्टर जमिनीवर शेती केली. शेतकऱ्यांच्या मिळकतीत सरासरी 81 टक्के वाढ झाली. उत्तर प्रदेश- लखनऊ, वाराणसी, झाशी, फतेहपूर, मुजफ्फरनगर, कानपुर, मेरठ जिल्ह्यांत 20 गावांतील 3408 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. 2172 हेक्टरांवर आधुनिक शेतीमुळे  शेतकऱ्यांच्या मिळकतीत सरासरी 54 टक्के वाढ झाली. पंजाब- बरनाला, संगरूर, नवा शहर मधील 13 गावांतील 1999 शेतकऱ्यांनी सहभाग घेतला. पूसा उत्पन्नात 69 टक्के वाढ झाली. मध्य प्रदेश- बालाघाट, जबलपूरमध्ये शास्रज्ञांनी मदत केली. चिन्‍नौर जातीच्या तांदुळाचं उत्पादन 50 हजार क्विंटल पर्यंत पोहोचलं. य हरियाणा- गुराना, हिसारमध्ये गुलाबसिंह यांनी मधमाशी पालनात  45 बॉक्समधून 6 कुंलत मध उत्पादित केला. त्यातून त्यांना 60 हजार रुपये कमवले. छत्तीसगढ़- रायपूरमधील कड़कनाथ शेतकऱ्यांच्या पोल्ट्रीतील कोंबड्यांचं वजन 105 ते 120 दिवसांत वाढून 1.10 किग्रॅ झालं. बाजारात 700 ते 800 रुपये किलोने ते विकले गेले. वर्षात कमाई 80 ते 90 हजार रुपये झाली. झारखंड- मालती, रांचीतील शेतकरी महावीर लाकरा यांनी 6 एकरांत धान, भाजी आणि फळाचं उत्पन्न घेऊन जादाचे 1.48 लाख रुपये कमवाले.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Tags:

फोटो

महत्वाच्या बातम्या