भोपाळ, 15 मार्च : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh News) भोपाळमध्ये अटक करण्यात आलेल्या जमात-ए-मुजाहिदीन बांग्लादेशचे (JMB) 4 दहशतवादी 4 हजार रुपये देऊन भारतात दाखल झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वत: दहशतवाद्यांनी ATS च्या चौकशीदरम्यान याचा खुलासा केला. त्यांनी 2021 मध्ये कोविड लॉकडाऊनदरम्यान दलालांच्या मदतीने घुसखोरी केली होती. सर्वात आधी जहूर नावाचा दहशतवादी भारतात दाखल झाला होता. IG इंटेलिजेन्सी डॉक्टर आशिषने सांगितलं की, चारही दहशतवादी अलकायदा संघटनेची आयडीओलॉजी फॉलो करतात. इंटरनेट वॉइस कॉल्सच्या मदतीने संघटनेशी जोडलेल्या लोकांशी संवाद साधतात. भारत-बांग्लादेश बॉर्डरच्या दोन्ही बाजून दलालांचं नेटवर्क आहे. सुरवातीच्या चौकशीत दहशतवाद्यांनी त्रिपुरातून भारतात दाखल होत असल्याचं सांगितलं होतं. मात्र ATS कडून यांच्या जबाबाचाही तपास केला जात आहे. दहशतवादी अनेक महिन्यांपर्यंत भारत-बांग्लादेशच्या सीमेजवळी गावात राहिले. चौकशीत दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचा मार्ग, सीमेत दलाल कशाप्रकारे घुसखोरींना भारतात आणतात. याचीही माहिती दिली. दलालांचं नेटवर्क तोडण्यासाठी ATS ने स्पेशन टीमचं गठण केलं आहे. DSP रँकचे अधिकारी या टीमचं नेतृत्व करतील. JMB च्या चारही दहशतवाद्यांना MPATS आणि केंद्रीय गुप्त एजन्सीच्या संयुक्त अभियानात रविवारी भोपाळमध्ये अटक करण्यात आली होती. सोमवारी ATS ने त्यांना कोर्टात हजर कर 28 मार्चपर्यंत रिमांडवर ठेवलं आहे. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितलं की, आणखी दोन संशयास्पद व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. सीमेच्या दोन्ही ठिकाणी दलाल सक्रिय… दशतवादी काही दिवस आसाममध्ये राहिले. यानंतर उत्तरप्रदेशात राहिले. ATS ते राहिलेल्या ठिकाणचा तपास करीत आहे. याशिवाय दहशतवाद्यांशी संबंधित लोकल नेटवर्कचादेखील तपास केला जात आहे. याच्याशी संबंधित अनेक संशयास्पद व्यक्तींची चौकशी केली जात आहे. तपास एजन्सी त्यांना कुठून निधी पुरवला जातोय याचाही तपास करीत आहेत. चारही दहशतवादी पूर्णपणे ट्रेंड आहेत. त्यांचं हिंदीदेखील चांगलं आबे. त्यांच्या बोलण्यात बांग्लादेशी टोन ऐकू येत नाही. त्यामुळे भारतात येण्यापूर्वी त्यांनी हिंदी बोलण्याचं ट्रेनिंग घेतलं असू शकतं. ट्रेनिंगनंतर त्यांना भारतात पाठवण्यात आलं. भोपाळव्यतिरिक्त प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये तपास एजन्सी याचीही माहिती जमा करीत आहे. हे ही वाचा- मध्य प्रदेश ठरतंय दहशतवाद्यांचं नवं टार्गेट, ATS च्या कारवाईत 4 दहशतवादी ताब्यात बांग्लादेशातील मुलींचीही तस्करी… BSF ने ‘ह्यूमन ट्रॅफिकिंग मोड्स ऑपरेंडी ऑफ टाउट्स ऑन इंडो-बांग्लादेश बॉर्डर’ शीर्षकमधून एक अभ्यास केला होता. दर वर्षी हजारो बांग्लादेशी मुलींची भारतात तस्करी केली जाते.