JOIN US
मराठी बातम्या / देश / CRPF पथकावर दहशतवाद्यांचा Attack; सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरात नागरिकाचा मृत्यू, चौकशीचे आदेश

CRPF पथकावर दहशतवाद्यांचा Attack; सुरक्षा दलाच्या प्रत्युत्तरात नागरिकाचा मृत्यू, चौकशीचे आदेश

जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) शोपियान जिल्ह्यात (Shopian District) रविवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (Central Reserve Police Force, CRPF) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

श्रीनगर, 16 मे: जम्मू आणि काश्मीरच्या (Jammu and Kashmir) शोपियान जिल्ह्यात (Shopian District) रविवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (Central Reserve Police Force, CRPF) पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत एका नागरिकाचा मृत्यू झाला. स्थानिक रहिवाशांनी या घटनेचा निषेध केला. त्यानंतर अधिकाऱ्यांनी या घटनेच्या दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलवामा आणि शोपियान दरम्यानच्या सीमावर्ती भागात तुर्कवांगम-लिटर येथे दुपारी 1:10 वाजता दहशतवाद्यांनी पोलीस आणि CRPF यांच्या संयुक्त गस्तीवर गोळीबार केला. पोलीस प्रवक्त्यानं सांगितलं की, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या गोळीबारात एक नागरिक गंभीर जखमी झाला. शोपियानमधील तुर्कवांगम येथील रहिवासी शोएब अहमद गनई याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. शोपियाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. सुरक्षा दलावर नागरिकाच्या हत्येचा आरोप शोपियाचे जिल्हा दंडाधिकारी सचिन कुमार म्हणाले, शोपियानच्या तुर्कवांगम भागातील घटनेची दंडाधिकारी चौकशी करण्यासाठी एडीएम (सहाय्यक जिल्हा दंडाधिकारी) यांनी दंडाधिकारी चौकशीचे आदेश दिले आहेत. कायद्यानुसार योग्य ती कारवाई केली जाईल. पोलिस प्रवक्त्यानं सांगितलं की, चकमकीनंतर दहशतवादी जवळच्या बागेत पळून गेले. पोलिसांनी संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण परिसराला नाकाबंदी करण्यात आली असून शोध मोहीम सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान, गनईला सुरक्षा दलांनी गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप करत स्थानिकांनी या घटनेचा निषेध केला. स्थानिकांनी दावा केला की, सुरक्षा दल कोणालातरी शोधत होते आणि शोध मोहिम दरम्यान गनईने सुरक्षा तपासणीसाठी आपले दोन्ही हात वर केले मात्र त्यांनी त्याच्यावर गोळीबार केला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या