JOIN US
मराठी बातम्या / देश / हैदराबादमध्ये हाहाकार! भिंत पडून 8 जणांचा मृत्यू, रस्त्यावर खेळण्यांप्रमाणे वाहून गेल्या गाड्या

हैदराबादमध्ये हाहाकार! भिंत पडून 8 जणांचा मृत्यू, रस्त्यावर खेळण्यांप्रमाणे वाहून गेल्या गाड्या

तेलंगणा (telangana) राजधानी हैदराबाद (hyderabad) येथे मंगळवारी उशिरा एक मोठी दुर्घटना घडली.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हैदराबाद, 14 ऑक्टोबर : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्र तयार झाल्यामुळे हैदराबाद, तेलंगणा आणि महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. मंगळवारी मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. इमारतीची भिंत कोसळून 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरीकडे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात गाड्या वाहून जात असल्याचं पाहायला मिळालं. तेलंगणा (telangana) राजधानी हैदराबाद (hyderabad) येथे मंगळवारी उशिरा एक मोठी दुर्घटना घडली. हैदराबादच्या बदलागुडा भागात मुसळधार पावसामुळे एक बोल्डर घरात पडला. यामुळे एका मुलासह 8 जणांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य 3 लोक जखमी झाले. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुर्घटनेची माहिती मिळताच उच्च अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या परिसरात सध्या बचावकार्य सुरू आहे.

संबंधित बातम्या

जाहिरात
जाहिरात

हे वाचा- उत्तर पुण्यात मुसळधार पाऊस, 5 जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाकडून रेड अलर्ट रविवारी हैदराबादमध्ये पावसामुळे इमारतीचा भाग कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले हुसेनालममध्ये रात्री 12 च्या सुमारास या घरात रात्री दुर्घटना घडली. या घरात 7 लोक राहात होती. हैदराबादमध्ये अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे त्यामुळे नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्र. तळ कोकण आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या