JOIN US
मराठी बातम्या / देश / शिक्षकी पेशाला काळीमा! नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण, नराधम अटकेत

शिक्षकी पेशाला काळीमा! नापास करण्याची धमकी देत विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण, नराधम अटकेत

नापास करण्याची धमकी देऊन (Threatening to fail) क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण (Sexual abuse) करणाऱ्या नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक (teacher arrest) केली आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

रामनाथपुरम, 23 जून: नापास करण्याची धमकी देऊन (Threatening to fail) क्लासेसला येणाऱ्या विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण (Sexual abuse) करणाऱ्या नराधम शिक्षकाला पोलिसांनी अटक (teacher arrest) केली आहे. एका विद्यार्थिनीनं तक्रार केल्यानंतर आरोपी शिक्षकाचा प्रताप समोर आला आहे. आरोपी शिक्षकानं नापास करण्याची धमकी देऊन अनेक मुलींना आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची माहितीही समोर आली आहे. याबाबत एक ऑडिओ क्लिप (Audio Clip) सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होतं आहे. या घटनेनंतर नातेवाईकांमधून संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. संबंधित घटना तामिळनाडूमधील रामनाथपुरम जिल्ह्यातील मुदुकुलाथूर येथील सरकारी अनुदानित शाळेत घडली आहे. आरोपी शिक्षक विज्ञान विषयाचा शिक्षक असून कोचिंग देण्याच्या बहाण्यानं तो विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करत होता. कोचिन क्लासेस घेत असताना आरोपी शिक्षक विद्यार्थिनीकडून मोबाईल नंबर घ्यायचा. त्यानंतर कोणताही बहाणा करुन जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याचबरोबर फोन करून अश्लील आणि लज्जास्पद गप्पा मारायचा. दरम्यान आरोपी शिक्षकानं एका मुलीला खास कोचिंग क्लासेसाठी घरी येण्यास सांगितलं. शिवाय घरी न आल्यास नापास करेल, अशी धमकीही आरोपी शिक्षकानं दिली होती. संबंधित आरोपी शिक्षकानं विद्यार्थिनीला कॉल केल्यानंतरची एक ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या ऑडिओमध्ये आरोपीनं यापूर्वी देखील बऱ्याच विद्यार्थिनींना आपल्या वासनेचा शिकार बनवल्याची कबुली दिली आहे. आरोपी शिक्षकानं इतर अनेक विद्यार्थिनींची नावं घेऊन चुकीच्या टिप्पण्या देखील केल्या आहेत. हेही वाचा- रक्षकच झाली भक्षक! महिला अधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलावर अत्याचार याप्रकरणी मुधुकुलाथूर पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षकाविरोधात बाल लैंगिक अत्याचारासह बलात्कार आणि अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या