JOIN US
मराठी बातम्या / देश / पाकिस्तानात जाऊन लादेनला मारलं जातं तर काहीही शक्य आहे : अरुण जेटली

पाकिस्तानात जाऊन लादेनला मारलं जातं तर काहीही शक्य आहे : अरुण जेटली

भारत आणि पाकस्तानमध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला असताना जेटली यांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण आहे.

जाहिरात

New Delhi: Union Finance Minister Arun Jaitley addresses a press conference after the 'Annual Review Meeting with Public Sector Banks', in New Delhi, Tuesday, Sept 25, 2018. (PTI Photo/Manvender Vashist) (PTI9_25_2018_000200B)

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी : ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानात जाऊन मारलं जातं तर आजच्या परिस्थितीत काहीही शक्य आहे, असं विधान केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केलं आहे. भारत आणि पाकस्तानमध्ये सीमेवर तणाव निर्माण झाला असताना जेटली यांनी केलेलं हे विधान महत्त्वपूर्ण आहे. सीमेवर गोळीबार गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या घडामोडींमुळे काश्मिरातील वातावरण तापलं आहे. सीमेवर भारत आणि पाकिस्तानच्या सैन्यामध्ये सतत चकमकी सुरू आहेत. म्मू-काश्मीरमधील शोपियानमध्ये पाककडून गोळीबार करण्यात आला. त्याला भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. यावेळी भारताने पाकच्या 5 चौक्या उद्ध्वस्त केल्या तसंच पाकिस्तानचे काही सैनिकही मारले गेल्याची माहिती आहे. भारताने दहशतवाद्यांच्या तळावर हवाई हल्ला केल्यानंतर मंगळवारी संध्याकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात येत आहे. त्यानंतर भारतानेही चांगलंच प्रत्युत्तर दिलं आहे. Army ‘इन अॅक्शन’, पहाटे दोन दहशतवाद्यांचा खात्मा शोपियानमध्ये भारतीय लष्कराने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शोपियानमध्ये पहाटे दहशतवादी आणि लष्करामध्ये बराच वेळ चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातलं आहे. भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला अटक केली, पाकिस्तानचा दावा ‘आम्ही भारताची 2 विमानं पाडून एका वैमानिकाला ताब्यात घेतलं आहे,’ असा दावा पाकिस्तानने केला आहे. काही वेळापूर्वी भारताची दोन विमानं काश्मीरमध्ये कोसळली आहेत. ही विमानं आम्हीच पाडली आहेत, असा दावा पाकच्या लष्कराने केला आहे. भारताने पाकिस्तानचं F16 विमान पाडलं भारताने पाकव्याप्त काश्मिरमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकनंतर भारत- पाकिस्तानच्या एलओसीवर तणावाची परिस्थीती निर्माण झाली आहे. यात दर मिनिटाला नवीन अपडेट येत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय वायुसेनेने नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानचे फायटर जेट F16 पाडलं आहे. विमानातील सैनिक पॅराशूटमधून उतरताना दिसले. मात्र ते नक्की कोणत्या दिशेला गेले हे अजून कळू शकले नाही. VIDEO : हाऊज द जोश, वाघा बाॅर्डरवर पाकसैनिकांसमोर भारतीयांचा तुफान जल्लोष

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या