JOIN US
मराठी बातम्या / देश / ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची व्हॅन खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू, हिमाचल प्रदेशमधील दुर्दैवी घटना

ट्रेकिंगसाठी आलेल्या विद्यार्थ्यांची व्हॅन खोल दरीत कोसळली, 7 जणांचा मृत्यू, हिमाचल प्रदेशमधील दुर्दैवी घटना

वाराणसीमधील महाविद्यालयातील विद्यार्थी हिमाचल प्रदेशात ट्रेकिंगसाठी आले होते.

जाहिरात

वाराणसीमधील महाविद्यालयातील विद्यार्थी हिमाचल प्रदेशात ट्रेकिंगसाठी आले होते.

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

हिमाचल, 26 सप्टेंबर : हिमाचल प्रदेशमधून मोठी बातमी समोर आली आहे. कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ पर्यटकांना घेऊन जाणारा टेम्पो ट्रॅव्हलर दरीत कोसळला आहे. या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे, तर 10 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुल्लू औट लुहरी राष्ट्रीय महामार्ग 305 घियागीजवळ हा अपघात झाला आहे. एक टेम्पो ट्रॅव्हलर व्हॅन रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास दरीत कोसळली.

संबंधित बातम्या

या अपघातात 7 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर 10 जण गंभीर आहे. 5 जखमींना कुल्लूच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले, ५ जखमींवर बंजार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 7 मृतदेह ताब्यात घेतले आहे. वाराणसीमधील महाविद्यालयातील विद्यार्थी हिमाचल प्रदेशात ट्रेकिंगसाठी आले होते. त्याच दरम्यान हा अपघात झाला. घटनास्थळी पोलीस आणि बचाव कर्मचारी वेळेवर पोहोचले. दरीत उतरून 7 पर्यटकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या