JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / प्रेम जिंकलं! व्हिलचेअरवर नवरदेव अन् त्याच्यामागे नवरी; असा पार पडला अनोखा विवाह सोहळा

प्रेम जिंकलं! व्हिलचेअरवर नवरदेव अन् त्याच्यामागे नवरी; असा पार पडला अनोखा विवाह सोहळा

13 मार्च 2016 मध्ये झालेल्या अपघातात राहुलचा अपघात झाला आणि शरीराच्या खालचा भाग लकवाग्रस्त झाला. त्यादरम्यानही अनामिकाने त्याला साथ दिली. दिव्यांगावर मात करत प्रेमच वरचढ ठरलं आहे.

0105

सोमवारी 29 वर्षीय राहुल सिंह दिवाकर आणि अनामिका यांचं लग्न झालं. आता यात मोठं काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. पण खास बाब म्हणजे दिव्यांगावर मात करत प्रेमच वरचढ ठरलं आहे. राहुलचा 2016 मध्ये एक अपघात झाला. त्या अपघातात त्याच्या शरीराच्या खालचा भाग लकवाग्रस्त झाला. तेव्हापासून तो व्हिलचेयरवर आहे.

जाहिरात
0205

अनामिकाने हे सर्व मागे टाकत राहुलशी लग्न केलं. चंडीगढमध्ये राहणारे हे दोघे एकमेकांचे शेजारी होते. 2008 पासून ते रिलेशनशिपमध्ये होते.

जाहिरात
0305

पण 13 मार्च 2016 मध्ये राहुलचा अपघात झाला आणि शरीराच्या खालचा भाग लकवाग्रस्त झाला. त्यादरम्यानही अनामिकाने त्याला साथ दिली. अनामिका तेव्हापासून नेहमी मला प्रोत्साहन देत असल्याचं राहुलने सांगितलं.

जाहिरात
0405

राहुलचे वडील सेनेत आहेत. त्याची आई आणि बहीण शिक्षक आहेत. राहुलच्या वडीलांची 2018 मध्ये बदली झाली आणि ते लखनऊला गेले. काही दिवसांनंतर अनामिका त्याच्या घरी गेली आणि तिने लग्नाबाबत विचारलं.

जाहिरात
0505

अनामिकाच्या आईचा सहा वर्षांपूर्वी बोन कॅन्सरने मृत्यू झाला. तर काही वर्षांपूर्वी तिच्या वडिलांचं ब्रेन हॅमरेजने निधन झालं. मला राहुलचा प्रामाणिकपणा, चांगुलपणा आवडतो. मला पुढचं संपूर्ण आयुष्य त्याच्यासोबत घालवायचं आहे. मी त्याच्याशी लग्न करून खूप आनंदी, असल्याचं अनामिकाने सांगितलं.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या