JOIN US
मराठी बातम्या / देश / धक्कादायक! उपासमारीमुळे गावकऱ्याचा मृत्यू; दोन दिवस घरात पडून होता मृतदेह

धक्कादायक! उपासमारीमुळे गावकऱ्याचा मृत्यू; दोन दिवस घरात पडून होता मृतदेह

दार उघडलं तेव्हा घरात अन्नाचा एक कणही नव्हता..तर मनोहरलाल खाटेवर मृत अवस्थेत पडून होते

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

लखनऊ, 29 नोव्हेंबर : उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) बरेली जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. सद्यपरिस्थितीतही देशात भूकबळी होऊ शकतो हे कदाचित कोणाला खरं वाटणार नाही. मात्र हा प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले आहे. बरेली जिल्ह्यातील एका गावकऱ्याचा दोन दिवसांपासून त्याच्या घरात मृतदेह पडून होता. शनिवारी शेजाऱ्याने भिंत तोडून घरात प्रवेश केला असता हा खुलासा झाला. नातेवाईकांच्या मते, या व्यक्तीच्या घरात खाण्यासाठी अन्नाचा एक कण नव्हता. गावकऱ्याला नोव्हेंबर महिन्याचे रेशनच मिळालं नाही. नातेवाईक आणि शेजार्‍यांच्या म्हणण्यानुसार उपासमारीमुळे त्याचा मृत्यू झाला आहे. परंतु लेखापाल यांच्या अहवालानुसार, सहा महिन्यांपूर्वी गावकरी बैलाच्या हल्ल्यात जखमी झाला होता. या आजारातून त्याचा मृत्यू झाला आहे. शवविच्छेदन न करता कुटुंबाने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यास सांगितण्यात आले. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, 50 वर्षांचा मनोहर लाल खापरेलुनाच्या घरात एकटाच राहत होता. तो रद्दी विकून आणि शेजार्‍यांना काही अन्न घेऊन पोट भरत होता. दोन दिवसांपासून त्याच्या घराचा दरवाजा बंद होता. शनिवारी सकाळी शेजाऱ्यांनी गावकऱ्याच्या नातेवाईकांना याची माहिती दिली. याबाबत सूचना मिळतात त्याचे नातेवाईक घरी आले. दार ठोठावूनही दार उघडत नसल्याने त्यांनी भितींवरुन उडी मारून घरात प्रवेश केला. तर तिथे खाटेवर मनोहर मृत पडले होते. त्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यांचं म्हणणं आहे की, घरात अन्नाचा एक कणही नव्हता. त्यांना वाटतं की अन्न न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा. हे ही वाचा- ‘कोविडशील्ड’ लशीमुळे गंभीर साइड-इफेक्ट; 5 कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी ऑक्टोबर महिन्यात मनोहरलाल यांना रेशन मिळालं होतं. मात्र नोव्हेंबरचं रेशन मिळू शकलं नव्हतं. त्यांच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. तर दुसरीकडे लेखापालच्या रिपोर्टनुसार सहा महिन्यांपूर्वी मनोहरलाल यांच्यावर बैलाने हल्ला केला होता. त्यात ते जखमी झाले होते. तेव्हापासून ते खूप आजारी होते. त्यांचा मृत्यू भूकेमुळे नाही तर आजारामुळे झाला आहे. 30 वर्षांपूर्वी जमीन विकून घर केलं खरेदी 30 वर्षांपूर्वी मनोहर लाल यांनी आपल्या हक्काची जमीन विकून छोटंसं घर खरेदी केलं होतं. गावकऱ्यांनी सांगितलं की त्यांनी महाराष्ट्रातील एका महिलेसोबत लग्न केलं होतं, मात्र एका वर्षात ती त्यांना सोडून निघून गेली. तेव्हापासून ते एकटे राहतात. धक्कादायक म्हणजे दोन दिवस मनोहरलाल यांचा मृतदेह घरात पडून होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या