JOIN US
मराठी बातम्या / देश / दगडफेक, लाठीमार, पोलिसांवर हल्ला; दिल्लीच्या आंदोलनाचे 5 धक्कादायक VIDEO

दगडफेक, लाठीमार, पोलिसांवर हल्ला; दिल्लीच्या आंदोलनाचे 5 धक्कादायक VIDEO

Farmer’s Protest Delhi: आजच्या दिवसभरात समोर आलेले पाच सगळ्यात धक्कादायक VIDEO

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 26 जानेवारी : कृषी कायद्यांविरोधात आज आंदोलक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर रॅली काढली. या रॅलीला आक्रमक रुप आल्याचे पाहायला मिळाले. आंदोलक शेतकऱ्यांनी पोलिसांवरच हल्ला केल्याच्या काही घटना या रॅलीदरम्यान पाहायला मिळाल्या. या रॅलीदरम्यान झालेल्या 5 धक्कादायक घटनांचे व्हिडिओ पाहूया.

चिल्ला बॉर्डरवर ट्रॅक्टर परेडआधी काही शेतकरी स्टंट करत होते. त्यावेळी ट्रॅक्टर पलटल्यामुळे एक शेतकरी जखमी झाला. या घटनेचा व्हिडिओही समोर आला. पाहा नेमकं काय घडलं.

दिल्लीच्या सीमेवर तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना अश्रूधुराचा वापर करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना आंदोलकांवर लाठीचार्ज करावा लागला.

संबंधित बातम्या

ट्रॅक्टर रॅलीदरम्यान एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला. यामध्ये काही जण हातात लाठ्या-काठ्या घेऊन रस्त्यावर उतरले आहेत आणि कडेने जाणाऱ्या ट्रॅफिक पोलिसाला काठ्यांनी मारत असल्याचं यात दिसतं. महिला पोलीस कर्मचारीही त्या पोलिसांबरोबर दिसत आहे.

जाहिरात

या आंदोलनादरम्यानचा आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. काही आंदोलक पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर चढवण्याचा प्रयत्न करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

जाहिरात

दिल्ली पोलिसांनी ठिकठिकाणी कडेकोड बंदोबस्त लावून सुद्धा शेतकरी आपले ट्रॅक्टर घेऊन लालकिल्ल्यावर धडकले आहे. लाल किल्ल्यावर पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांनी जोरदार जल्लोष केला आहे. त्यानंतर संतप्त झालेला जमाव हा लाल किल्ल्यात घुसला आणि जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी परिसर दणाणून सोडला. काही वेळानंतर शेतकरी आंदोलकांनी किल्ल्याच्या घुमटावर आंदोलनाचा झेंडा फडकावला. हा व्हिडीओ समोर आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या