JOIN US
मराठी बातम्या / देश / संविधानाच्या मर्यादेचं पालन करणं हेच माझं कर्तव्य -रामनाथ कोविंद

संविधानाच्या मर्यादेचं पालन करणं हेच माझं कर्तव्य -रामनाथ कोविंद

" माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावूक आहे, मला समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार"

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

20 जुलै : ‘माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावूक आहे, मला समर्थन दिल्याबद्दल सर्वांचे आभार, या पदावर राहुन संविधानाच्या मर्यादेचे पालन करणं हेच माझं कर्तव्य आहे अशी प्रतिक्रिया रामनाथ कोविंद यांनी दिली. राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर कोविंद यांनी मीडियाशी संवाद साधताना भावूक झाले. कोंविद म्हणाले, की ‘हा क्षण त्यांना अत्यंत भावूक करणारा क्षण आहे. पंतप्रधान मोदींसमवेत अनेक नेत्यांनी कोविंद यांचे अभिनंदन केलं. कोविंद यांच्या गावातसुद्धा उत्सवाचं वातावरण आहे. कोविंद यांची पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहांनी भेटही घेतली. रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या समर्थकांचे आभार मानले. ते म्हणाले, ‘माझ्यासाठी हा क्षण अत्यंत भावूक आहे, मला समर्थन दिल्याबद्दल धन्यवाद. देशातील लोक प्रतिनिधींनी माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल त्यांचे आभार. मीरा कुमारांनाही पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. माझ्या समाजाप्रती असलेला सेवाभावच मला इथपर्यंत घेऊन आला. या पदावर राहून संविधानाच्या मर्यादेचे पालन करणे हे माझे कर्तव्य आहे.’ मीरा कुमार यांनीही रामनाथ कोविंद यांना शुभेच्छा दिल्या. त्या म्हणाल्या ,‘अशा आव्हानात्मक काळात संविधानाच्या भावनेचे रक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे आणि यासाठी मी कोविंदांना शुभेच्छा देते. मला समर्थन देण्यासाठी सोनिया गांधी आणि इतर राजकीय पक्षांचे आभार मानते. धर्मनिरपेक्षता आणि दलित ,वंचितांसाठी माझी लढाई चालूच राहील. मला सहयोग करण्यासाठी मी माझ्या शुभचिंतकांचेही आभार मानते.’

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या