JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / बांधकाम पूर्ण झाल्यावर भव्य, दिव्य दिसेल Ram  Mandir, पाहा Exclusive Photos

बांधकाम पूर्ण झाल्यावर भव्य, दिव्य दिसेल Ram  Mandir, पाहा Exclusive Photos

नियोजित वेळेत बांधकाम पूर्ण होईल यासाठी प्रत्येक टप्प्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

0106

अयोध्येत राम मंदिराचं भूमिपूजन बुधवार 5 ऑगस्टला होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे भूमिपूजन होईल. मंदिराचं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ते कसं दिसेल याचे काही फोटो प्रसिद्ध झाले असून त्यातून मंदिराची भव्यता दिसून येते.

जाहिरात
0206

राम मंदिर भव्य दिव्य, देखणं आणि वास्तूशास्त्राचा अजोड नमुना ठरावं अशी योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार तज्ज्ञांकडून त्याचं संकल्पचित्रही तयार करण्यात आलं आहे.

जाहिरात
0306

लाल आणि गुलाबी दगडांमध्ये त्याचं बांधकाम होणार असून अतिशय सुंदर कलाकुसर त्यावर राहणार आहे. त्यासाठी राजस्थानातल्या खास कारागिरांना बोलावण्यात आलं आहे.

जाहिरात
0406

मंदिर भव्य आणि देखणं असण्याबरोबरच ते वास्तुशास्त्रानुसार परिपूर्ण व्हावं यासाठी तज्ज्ञांनी अनेक दिवस अभ्यास करून त्याचा नकाशा तयार केला आहे.

जाहिरात
0506

मंदिर भूकंप, पाऊस, उन्ह वारा यापासून दीर्घकाळ कसं सुरक्षित राहिल याचाही विचार करण्यात आला आहे.

जाहिरात
0606

मंदिरात नैसर्गिक खेळती हवा, उजेड राहिल याचीही काळजी घेण्यात आली असून नियोजित वेळेत बांधकाम पूर्ण होईल यासाठी प्रत्येक टप्प्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या