JOIN US
मराठी बातम्या / देश / मुस्लिमांसाठी अयोध्या हे धार्मिक स्थळ नाही -उमा भारती

मुस्लिमांसाठी अयोध्या हे धार्मिक स्थळ नाही -उमा भारती

उमा भारती यांनी कोर्टाच्या बाहेर या प्रकरणावर निर्णय व्हावा अशी मागणी केलीये.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

27 सप्टेंबर : केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर पुन्हा एका वादग्रस्त विधान केलंय. राम जन्मभूमी-बाबरी मस्जिद क्षेत्रावरील वाद हा कधी धार्मिक नव्हता पण या वादाला असं रूप देण्यात आलं असं उमा भारती यांनी म्हटलंय. वाद असलेल्या जागेवर मुस्लिम समाजासाठी कधी धार्मिक स्थळ बनू शकत नाही. मक्काच्या पवित्र जागेप्रमाणे ते विचार करताय. असं ही उमा भारती म्हणाल्यात. तसंच हा काही धार्मिक जागेचा वाद नाहीये. अयोध्या ही हिंदंसाठी महत्त्वपूर्ण जागा आहे कारण इथं भगवान रामांचा जन्म झाला होता असंही त्या म्हणाल्यात. मुस्लिम समाजासाठी हे धार्मिक स्थळ नाही. या प्रकरणी दावा करून पुढे रेटण्यात आलंय आणि याचं रुपांतर जमिनीच्या वादात झालंय असा दावाही उमा भारती यांनी केला. उमा भारती यांनी कोर्टाच्या बाहेर या प्रकरणावर निर्णय व्हावा अशी मागणी केलीये. या प्रकरणाचा तिढा हा कोर्टाबाहेरही सोडवलं जाऊ शकतो असं पुन्हा एकदा उमा भारती यांनी म्हटलंय. दरम्यान, सुप्रीम कोर्टाने राम मंदिराच्या प्रकरणावर सुनावणी सुरू केली ही महत्त्वपूर्ण घटना आहे. आम्हाला आशा आहे की, या प्रकरणी लवकर निर्णय यावा अशी अपेक्षाही भारती यांनी केली. बाबरी विध्वंस प्रकरणात उमा भारती, मुरली मनोहर जोशी आणि लाल कृष्ण अडवाणी यांच्यावर कट रचल्याचा खटला सुरू आहे. दरम्यान आज कोर्टाने  बाबरी मस्जिद खटल्याप्रकरणी महत्त्वाचा निर्णय दिलाय. बाबरी खटला हा मोठ्या खंडपीठाकडे सोपवणार नाही. हा वाद सोडवण्यात आता आणखी उशीर नको अशी भूमिका सुप्रीम कोर्टाने मांडली. त्यामुळे बाबरी मस्जिद खटल्याचा निकाल लवकरच सुटणार आहे. सुप्रीम कोर्टाने 29 आॅक्टोबरपासून बाबरी खटल्याच्या सुनावणीला हिरवा कंदील दिलाय. मशीद इस्लाम धर्माचा अविभाज्य भाग आहे की नाही, याबाबत निर्णय वाचायला कोर्टात सुरुवात झाली. याबाबतचा खटला मोठ्या खंडपीठाकडे सोपवणार नाही असं निर्णय न्यायमूर्तींच्या बहुमतानं घेतला. सुप्रीम कोर्टात मुस्लिम समाजाकडून युक्तिवाद करण्यात आला. या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय घेण्यात आला यावा. या प्रकरणाचा निर्णय हा मोठ्या खंडपीठाकडे द्यावा की नाही याबद्दलचा निर्णय सुप्रीम कोर्टाने 20 जुलै रोजी राखून ठेवला होता. आज कोर्टाने स्पष्ट केलंय की, अधिग्रहणापासून मशिदीही सुटल्या नाही.बाबरीचा खटला मोठ्या खंडपीठाकडे सोपवणार नाही. हा वाद सोडवण्यात आता आणखी उशीर होणार नाही अशी भूमिका मांडली. =================================================================== VIDEO : ड्रोनच्या नजरेतून पुण्यातील पाण्याचा हाहाकार

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या