JOIN US
मराठी बातम्या / देश / राहुल गांधी म्हणाले, ‘आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक, पण...'

राहुल गांधी म्हणाले, ‘आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक, पण...'

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 1975 ते 1977 या दरम्यान देशांतर्गत आणीबाणी (Emergency in India) लावली होती. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 03 मार्च : माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांनी 1975 ते 1977 या दरम्यान 21 महिने देशांतर्गत आणीबाणी (Emergency in India) लावली होती. इंदिरा गांधींचा तो निर्णय भारतीय राजकारणातील वादग्रस्त पान आहे. भाजपासह काँग्रेसचे सर्व विरोधक या निर्णयावर आजही टीका करत असतात. काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी या विषयावर त्यांच मत प्रदर्शित केलं आहे. अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाचे प्राध्यापक आणि देशाचे माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांना राहुल गांधी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीमध्ये त्यांना आणीबाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. ‘माझ्या मते ती एक चूक होती. त्यावेळी जे घडलं ते नक्कीच चूक होतं. पण, आजच्या काळात जे घडत आहे ते एकदम वेगळं आहे. त्यावेळी काँग्रेसनं संस्थात्मक पाया ताब्यात घेण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. आमच्या पक्षाचा असलेला लोकशाही गाभा त्याला परवानगी देत नाही. आमची तसं करण्याची इच्छा असेल तरी आम्ही ते करु शकत नाही.’ राहुल गांधी पुढे म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) हे काम वेगळ्या पद्धतीनं पूर्ण करत आहे. संघाकडून घटनात्मक पदावर त्यांची माणसं भरली जात आहेत. आम्ही निवडणुकीत भाजपाला हरवलं तरी या लोकांना काढू शकत नाहीत.’ (हे वाचा :  खळबळजनक! भाजपा खासदाराच्या मुलावर बाइकस्वारांनी झाडल्या गोळ्या, आरोपी फरार ) ‘काँग्रेसमध्ये लोकशाहीची गरज’ काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही मागणी होत आहे. त्या विषयावर राहुल गांधी म्हणाले की, ‘काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाहीला चालना देण्यावर मी अनेक दिवसांपासून बोलत आहे. त्यासाठी पक्षातील नेत्यांनीच माझ्यावर टीका केली होती. पक्षांतर्गत लोकशाही आवश्यक असल्याचं मी आमच्या पक्षातील नेत्यांना सांगितले आहे.’ ‘आधुनिक लोकशाहीत स्वतंत्र संस्था असल्यानंच ती प्रभावी आहे. पण भारतामध्ये त्याच्या स्वातंत्र्यावरच हल्ला करण्यात आला आहे,‘असा आरोप देखील राहुल यांनी केला. ‘आम्हाला संसदेत बोलण्याची परवानगी नाही. न्यायालयाकडून अपेक्षा नाही. आरएसएस-भाजपाकडं अफाट आर्थिक शक्ती आहे. व्यावसायिकांना विरोधी पक्षाच्या बाजूनं उभं राहण्याची परवानगी नाही. हा लोकशाही विचारपद्धतीवरच हल्ला आहे,’ अशी टीका देखील राहुल गांधी यांनी या मुलाखतीच्या दरम्यान केली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या