JOIN US
मराठी बातम्या / देश / Pulwama Encounter: अखेर बदला घेतला, 'जैश'च्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

Pulwama Encounter: अखेर बदला घेतला, 'जैश'च्या 2 दहशतवाद्यांचा खात्मा

लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशिद याचाही समावेश असल्याची माहिती आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पुलवामा, 18 फेब्रुवारी: पुलवामात सीआरपीएफ जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याला भारतीय सुरक्षा यंत्रणेनं जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. लष्कराने जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. यामध्ये पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार गाजी रशिद उर्फ कामरान आणि हिलाल अहमद या दोघांचा समावेश आहे. पण याबाबत अजून अधिकृतरित्या काही सांगण्यात आलेलं नाही. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पिंगलान येथे भारतीय सुरक्षा जवान आणि जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांच्यात चकमक सुरु आहे. वाचा-  पुलवामात दहशतवाद्यांसोबत चकमक; मेजरसह ४ जवान शहीद पुलवामा हल्ल्यासाठी गेल्या महिन्यात पुंछ मार्गे जैश-ए-मोहम्मदचे 15 दहशतवाद्यांनी भारतात घुसखोरी केली होती. या दहशतवाद्यांमध्ये कामरानचा देखील समावेश होता. काश्मीरमधील स्थानिक युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्याने काही उपकरणे आणि अन्य स्फोटके देखील आणली होती. कोण आहे गाजी रशिद 28 वर्षीय दहशतवादी राशिद दोन महिन्यांपूर्वी कुपवाडा मार्गे भारतात दाखल झाला होता. राशिद याने एका अफगाण युद्धात महत्त्वाची भूमिका पार पाडली होती. पाकिस्तान लष्कराच्या एका विशेष गटाने राशिदला प्रशिक्षण दिल्याची माहिती समोर येत आहे. पाकिस्तान लष्करामधील एका गटाकडून पाक व्याप्त काश्मीरमधील ऑपरेशनवर लक्ष ठेवले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राशिदने पाकिस्तानमधील उत्तर-पश्चिम सीमा भागातील एका युद्धात सहभाग घेतला होता. अफगाणिस्तानमध्ये मुजाहिद्दीन असलेल्या गाजी राशिद हा आयईडी एक्सपर्ट होता. राशिद आणि त्याचा दोन साथीदारांनी डिसेंबरमध्ये भारतात घुसखोरी केली होती. त्यानंतर ते दक्षिण काश्मीरमध्ये लपले होते. जैशने त्याचा कमांडर राशिदला काश्मीरमध्ये हल्ला करण्याचे आदेश दिले होते, अशी माहिती आता गुप्तचर विभागाने दिली आहे. काश्मीरमध्ये हल्ला करताना स्थानिक युवकाचा वापर केला जावा अशी जैशची योजना होती. गेल्या वर्षभरात दहशतवादाच्या मार्गावर केलेल्या अनेक युवकांना ऑपरेशन ऑलआउटमध्ये ठार मारण्यात आले आहे. यात जैशचा कमांडर मसूद अजहरच्या बहिणीचा मुलगा तल्हा आणि भावाचा मुलगा उस्मान या दोघांचा समावेश आहे. या दोघांना भारतीय लष्कराने दक्षिण काश्मीरमध्ये ठार मारले होते. पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याची पूर्ण योजना पाकिस्तानी नागरिक राशिदने आखली होती. राशिद जैशचा सदस्य आहे. तो दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, अवंतीपुरा आणि त्राल या परिसरात सक्रीय आहे. सुरुवातीच्या तपासानुसार राशिदने त्रालमधील मिदूरा येथे दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. Pulwama Encounter: भारतीय लष्कराने दहशतवाद्यांना घेरले, ग्राऊंडवरून पहिला VIDEO

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या