नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) एका 10 वर्षांच्या चिमुरडीचा बालहट्ट पुरवला आहे. या चिमुकल्यानं पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि पंतप्रधानांनी वेळात वेळ काढून या मुलीचा बालहट्ट पुरवला आहे. ही चिमुकली दुसरी तिसरी कोणी नसून अहमदनगरचे (Ahmednagar Member of Parliament) खासदार डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांची मुलगी आहे. सुजय विखे पाटील यांची 10 वर्षांची मुलगी अनिशानं (Anisha) पंतप्रधान नरेंद्र मोदींना ईमेल पाठवून भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ रिप्लायच नाही तर तिची भेटही घेतली आहे. मोदींनी केलेल्या रिप्लायची ही आता चर्चा झाली आहे. अनिशाच्या ईमेलला मोदींनी दिला होता रिप्लाय भाजपच्या ट्विटर हँडलवरुन ही माहिती देण्यात आली आहे. ट्विटमध्ये म्हटलं की, 10 वर्षांच्या मुलीनं ईमेल करत पंतप्रधानांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली आणि पंतप्रधानांनी तिची इच्छा पूर्ण केली.
मुलीच्या ईमेलला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रिप्लाय केला. या रिप्लायमध्ये मोदींनी लिहिलं की, बेटी तुरंत दौड़े चले आओ. ज्यानंतर अनिशानं पंतप्रधानांची भेट घेतली आहे. 10 वर्षांची अनिशा ही राधाकृष्ण विखे पाटील यांची नातं आहे. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी या भेटीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. मात्र त्यांनी आपल्या पोस्टमध्ये ईमेलचा काहीही उल्लेख केलेला नाही. हेही वाचा- अबब! लाचखोर महिला शिक्षणाधिकाऱ्याची संपत्ती ऐकून व्हाल अवाक डॉ. सुजय विखे पाटील यांची पोस्ट पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांची आज दिल्ली येथे सहकुटुंब भेट घेतली.कोविड काळात सरकारने केलेल्या विविध उपाययोजना आणि कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाबद्दल त्यांचे यावेळी आभार मानले. सदर भेटीदरम्यान पंतप्रधान मोदीजींनी माझी मुलगी कु. अनिषा सोबतही दिलखुलासपणे संवाद साधला. समजूत घालूनही समजली नाही अनिशा अनिशानं खूप दिवसांपासून पंतप्रधान मोदींना भेटण्याची हट्ट लावला होता. सुजय विखे पाटील तिला नेहमी समजावण्याचा प्रयत्न करायचे की, ते खूप कामात व्यस्त असतात. अपॉईंटमेंट मिळणार नाही. यावर अनिशानं आपल्या वडिलांचा लॅपटॉप घेतला आणि मोदींना ईमेल केला. त्यावर ईमेलवर पंतप्रधानांकडून रिप्लायही आला.