जेव्हा राष्ट्रपती कोविंद यांच्यातले आजोबा जागे होतात!

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यातला सामान्य माणूस अजूनही जागा आहे, याचा प्रत्यय काल शिमल्यामध्ये आला.

Sonali Deshpande
शिमला, 23 मे : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यातला सामान्य माणूस अजूनही जागा आहे, याचा प्रत्यय काल शिमल्यामध्ये आला. एका कार्यक्रमासाठी कोविंद शिमल्यात होते. त्यांना सामान्य माणसाप्रमाणं फेरफटका मारावासा वाटला.तसं त्यांनी त्यांच्या सुरक्षा टीमला सांगितलं.मग सगळा लवाजमा पायी निघाला. कोविंद यांना पुस्तकाचं दुकान दिसलं. ते त्यात गेले आणि नातवंडांसाठी पुस्तकं घेतली. विशेष म्हणजे त्यांनी तुमच्या-आमच्या प्रमाणंच डेबिट कार्डनं पैसे दिले.२०१७मध्ये ते बिहारचे राज्यपाल होते तेव्हा शिमल्याला आले होते. यावेळी तिथल्या विद्यापिठातल्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली.

 

Trending Now