JOIN US
मराठी बातम्या / देश / President Election : राष्ट्रपती निवडणुकीत NCP ला क्रॉस व्होटिंगचा फटका, त्या आमदाराचं द्रौपदी मुर्मुंना मत!

President Election : राष्ट्रपती निवडणुकीत NCP ला क्रॉस व्होटिंगचा फटका, त्या आमदाराचं द्रौपदी मुर्मुंना मत!

राष्ट्रपती पदासाठीची (President Election) निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीसाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना तर युपीएकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) क्रॉस व्होटिंगचा फटका बसला आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 18 जुलै : राष्ट्रपती पदासाठीची (President Election) निवडणूक आज पार पडली. या निवडणुकीसाठी एनडीएकडून द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांना तर युपीएकडून यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्या विजयाचा मार्ग सध्या सोपा दिसत आहे. या निवडणुकीमध्ये यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. देशातल्या विरोधकांना एकत्र आणण्याचं काम पवारांनी केलं, पण त्यांच्याच पक्षाच्या आमदाराने द्रौपदी मुर्मू यांना मत दिलं आहे. गुजरातमधले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कंधाल जडेजा (Kandhal Jadeja) यांनी मुर्मू यांना मत दिलं. स्वत: जडेजा यांनीच आपण मुर्मू यांना मत दिल्याचं जाहीर केलं. यानंतर गुजरात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पटेल यांनी जडेजा यांच्याकडे स्पष्टीकरण मागितल्याचं वृत्त आहे. गुजरातमध्ये कंधाल हे राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेव आमदार आहेत. राज्यात 283 आमदारांचं मतदान दरम्यान महाराष्ट्रातून 283 आमदारांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. महाराष्ट्राच्या विधानसभेची संख्या 288 आहे, पण शिवसेना आमदार रमेश लटके यांचं निधन झाल्यामुळे सध्या विधानसभेत 287 आमदार आहेत. यापैकी राष्ट्रवादीचे नवाब मलिक आणि अनिल देशमुख हे जेलमध्ये आहेत. तर भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्यामुळे येऊ शकले नाहीत. शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांनीही मतदानाचा हक्क बजावला नाही. या आमदारांचं क्रॉस व्होटिंग कंधाल जडेजा यांच्याशिवाय उत्तर प्रदेशात सपाचे आमदार शिवपाल यादव आणि शहजिल इस्लाम, ओडिसात काँग्रेसचे आमदार मुकीम यांनी क्रॉस वोटिंग केलं. राष्ट्रपती निवडणुकीमध्ये व्हीप लागू होत नसल्यामुळे या आमदारांवर कारवाई होऊ शकणार नाही. राष्ट्रपती निवडणुकीचा निकाल 21 जुलैला लागणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या