भोपाळ, 1 सप्टेंबर : सुमारे 23 वर्षांपूर्वी (23 years ago) पाकिस्तानमध्ये (Pakistan) पोहोचलेल्या प्रल्हाद (Pralhad) यांची इतक्या वर्षांनी सुटका (Released) करण्यात आली आहे. मानसिक अवस्था (Mental condition) बरी नसलेले प्रल्हाद 23 वर्षांपूर्वी पाकिस्तानात कसे पोहोचले, हे कुणालाही समजलं नाही. ते पाकिस्तानच्या तुरुंगात आहेत, हेदेखील कुणाला माहित नव्हतं. 2014 साली पहिल्यांदाच प्रल्हाद यांच्याबाबत कुटुंबीयांना माहिती मिळाली आणि सुरू झाली त्यांच्या सुटकेची प्रतीक्षा प्रल्हाद यांची थरारक कहाणी मध्यप्रदेशातल्या घोसी पट्टी गावचे रहिवासी असणारे प्रल्हाद सिंह हे मानसिक आजाराने त्रस्त होते. 23 वर्षांपूर्वी ते अचानक घरातून बाहेर पडले आणि गायब झाले. ते कुठे गेले आहेत, याची कुणालाच कल्पना नव्हती. कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जंग जंग पछाडूनही त्यांचा शोध लागला नव्हता. ते गायब झाले तेव्हा 33 वर्षांचे होते. 2014 साली दिसला आशेचा किरण 2014 साली प्रल्हाद सिंह नावाचा एक कैदी पाकिस्तानात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी ही बाब प्रल्हाद यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांचे भाऊ वीर सिंह राजपूत यांना सांगितली. त्यानंतर राजपूत यांनी आपल्या भावाविषयी अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रल्हाद हे पाकिस्तानात असून त्यांना अवैधरित्या घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आल्याचं समजलं. त्यांची शिक्षा 2021 साली संपणार असल्याचं कळल्यामुळे आता प्रतीक्षा करण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय त्यांच्याकडे नव्हता. हे वाचा - एकुलत्या एका मुलाने केली आई, वडील, बहीण आणि आजीची हत्या अटारी सीमेवरून झाली घरवापसी शिक्षा संपल्यानंतर प्रल्हाद यांना अटारी आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात पाठवण्यात आलं. त्यांचा भाऊ आणि इतर कुटुंबीयांनी जाऊन प्रल्हाद यांचं स्वागत केलं. गेल्या 23 वर्षात आपल्या भावावर अनन्वित अत्याचार झाले असून त्याला आता नीट बोलताही येत नसल्याचं वीर सिंह राजपूत यांनी म्हटलं आहे. आपल्या भावाला जबर मारहाण आणि छळ करण्यात आला असून त्यामुळे त्याच्या मनावर अधिकच गंभीर परिणाम झाले आहेत. त्याची मनोवस्था पूर्ण बिघडली असून सतत तो घाबरलेला असतो, असं त्यांनी म्हटलं आहे. 23 वर्षांपूर्वी तो जितकं बोलत होता, तेवढंही आता त्याला बोलता येत नसल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. मात्र 23 वर्षांनंतर आपला भाऊ परत घरी आल्याचा मोठा आनंद कुटुंबीयांना झाला आहे.