JOIN US
मराठी बातम्या / देश / कोळशाची चणचण तीव्र तर देशभरातून विजेची रेकॉर्डब्रेक मागणी; काय आहे भारतातील सध्याची स्थिती?

कोळशाची चणचण तीव्र तर देशभरातून विजेची रेकॉर्डब्रेक मागणी; काय आहे भारतातील सध्याची स्थिती?

देशातल्या बहुतेक भागांत सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळं (Heat Wave) विजेची मागणी विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळं सर्वतोपरी प्रयत्न करूनही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना विजेची मागणी आणि पुरवठा यातली तफावत कमी करण्यात अडचणी येत आहे.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली 30 एप्रिल : देशातल्या औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पांसाठी (Thermal Power Generation Projects) साधारण 26 दिवसांचा अतिरिक्त कोळसा स्टॉकमध्ये (Coal stock) ठेवला जातो. परंतु, सध्या देशातल्या सुमारे 81 वीजनिर्मिती केंद्रांमध्ये (Power Plants) केवळ पाच दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. 47 केंद्रांमध्ये सहा ते 15 दिवस पुरेल इतका कोळशाचा साठा शिल्लक आहे. अशा कोळसा संकटाच्या (Coal Crisis) दरम्यान सुरू असलेल्या औद्योगिक घडामोडी आणि देशातल्या बहुतेक भागांत सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेमुळं (Heat Wave) विजेची मागणी विक्रमी स्तरावर पोहोचली आहे. त्यामुळं सर्वतोपरी प्रयत्न करूनही औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांना विजेची मागणी आणि पुरवठा यातली तफावत कमी करण्यात अडचणी येत आहे. शुक्रवारी (29 एप्रिल) ‘पीक अवर’मध्ये देशातली विजेची मागणी (Power Demand) 2,07,111 मेगावॉटच्या विक्रमी पातळीवर पोहोचली होती, अशी माहिती ऊर्जा मंत्रालयानं दिली आहे. ऊर्जा मंत्रालयानं याबाबत ट्विट केलं आहे, ‘आज सकाळी 14:50 वाजता, संपूर्ण भारतात विजेची कमाल मागणी 2,07,111 मेगावॉटवर पोहोचली आहे. ही आतापर्यंतची सर्वोच्च मागणी ठरली आहे,’ असं त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. झी न्यूजनं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारचा मोठा निर्णय; वेळेत कोळसा पोहोचवण्यासाठी 657 प्रवासी गाड्या रद्द यंदा उन्हाळा सुरू झाल्यापासून विजेची मागणी सातत्यानं वाढत आहे. वीज मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिलपर्यंत विजेची मागणी 204.653 गिगावॉट झाली आहे. गेल्या वर्षी ही मागणी 182.559 गिगावॉट इतकी होती. म्हणजेच विजेच्या मागणीत 12.1 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गुरुवारी संपूर्ण भारतात विजेची कमाल मागणी 2,04,653 मेगावॉट इतकी होती. विजेची मागणी वाढत असताना देशात कोळसा संकट उभं राहिलं आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोळशाच्या किमती (Coal Price) वाढल्यानं अशी परिस्थिती उद्भवल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. दिल्लीचे ऊर्जामंत्री सत्येंद्र जैन यांनी शुक्रवारी (29 एप्रिल) सांगितलं, की ‘देशभरात कोळशाचं संकट गंभीर असून अनेक वीज प्रकल्पांमध्ये केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळशाचा साठा शिल्लक आहे. सध्या पॉवर बॅकअप (Power Backup) नाही. कोळशाचा बॅकअप 21 दिवसांपेक्षा जास्त असावा लागतो. परंतु अनेक प्रकल्पांमध्ये एका दिवसापेक्षा कमी साठा शिल्लक आहे.’ जैन पुढे म्हणाले, ‘वीजनिर्मिती आणि वितरण होत राहिलं, तर कोणतीही अडचण नाही; मात्र, वीज प्रकल्प बंद झाल्यास दिल्लीत मोठी समस्या निर्माण होणार आहे. कारण, देशातल्या इतर ठिकाणीही कोळशाचा तुटवडा आहे.’ कारखान्यातून अमोनिया गॅस गळती; रहिवासी भागात भीतीचं वातावरण, परिसर केला रिकामा, अनेक जण रुग्णालयात दाखल दरम्यान, एनटीपीसीने नंतर एक निवेदन जारी केलं ज्यात असं लिहिलं आहे की, ‘दादरीचे सर्व सहा युनिट्स आणि उंचाहरमधली पाच युनिट्स पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. त्यांना नियमित कोळसा पुरवठा होत आहे. तिथला सध्याचा स्टॉक अनुक्रमे 1 लाख 40 हजार मेट्रिक टन आणि 95 हजार मेट्रिक टन इतका आहे. कोळशाच्या आयातीची प्रक्रियाही सुरू आहे.’ निवेदनात पुढे असं म्हटलं आहे, उंचाहरमधल्या ‘युनिट 1’मध्ये नियोजित वार्षिक दुरुस्ती सुरू असल्यानं ते बंद आहे. हे युनिट वगळता तेथील इतर सर्व युनिट्स पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. या वर्षी देशामध्ये बहुतेक ठिकाणी विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. अशा स्थितीमध्ये विजेच्या मागणीमध्येही अचानक वाढ दिसून आली आहे. त्यामुळे देशात कोळशाची कमतरता जाणवत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या