JOIN US
मराठी बातम्या / देश / Video : ...अन् पंतप्रधान मोदींनाही आवरला नाही मोह; मुंबईच्या समुद्राचे विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद

Video : ...अन् पंतप्रधान मोदींनाही आवरला नाही मोह; मुंबईच्या समुद्राचे विलोभनीय दृश्य कॅमेऱ्यात कैद

कोणीही मुंबईच्या प्रेमात पडेल असं दृश्य…

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 14 जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) हे आज महाराष्ट्राच्या (Maharashtra Today) दौऱ्यावर होते. पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते देहूमध्ये मंदिराचं लोकार्पण पार पडलं. पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण झाले. त्यानंतर ते मुंबईला रवाना झाले. यादरम्यान त्यांनी चॉपरमधून दिसणारं मुंबईच्या समुद्राचं सुंदर दृश्य कैद केलं आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. देहूमध्ये पंतप्रधानांच्या हस्ते जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे लोकार्पण सोहळा आज पार पडला. (pm narendra modi  inauguration of sant tukaram temple) यावेळी व्यासपीठावर उपस्थितीत असलेल्या नेत्यांपैकी देवेंद्र फडणवीस, देहू संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे या तिघांची भाषणे झाली. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव भाषणासाठी न पुकारल्यामुळे आता कार्यक्रमाच्या आयोजक समितीवर टीका होते आहे. खुद्द पंतप्रधान मोदी यांनीच याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे.

हा कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मुंबईकडे रवाना झाले. यावेळी पंतप्रधान मोदींनी अजित पवार यांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये सोबत घेतले. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सुद्धा हजर होते. साधारणपणे तासाभराचा हा प्रवास झाला. या प्रवासात काय चर्चा झाली, याचा तपशील समोर येऊ शकला नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या