JOIN US
मराठी बातम्या / देश / नव्या शेतकरी कायद्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

नव्या शेतकरी कायद्यावर महाराष्ट्रातील शेतकऱ्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं कौतुक

कृषी कायद्यावर कृषी सुधारणांनी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. पीक खरेदीच्या तीन दिवसानंतरच शेतकर्‍यांना त्याचा मोबदला दिला जातो.

जाहिरात
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 29 नोव्हेंबर : कृषी बिलविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन की बातमध्ये याबाबत माहिती दिली आहे. पंतप्रधानांचा हा कार्यक्रम कृषी कायद्याविरूद्ध कोरोना संकट आणि शेतकरी आंदोलन यांच्यात होत आहे. कृषी कायदा शेतकऱ्यांनी नीट समजून घ्यायला हवा. या कायद्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अधिकार मिळणार आहेत. शेतकऱ्यांनी या कायदा समजून घ्यायला हवा. यावेळी मन की बातमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धुळ्यातील शेतकऱ्याचं कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले, महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील शेतकरी जितेंद्र भोईजी यांनी नवीन शेतीविषयक कायद्यांचा कसा वापर केला हे आपण समजून त्याची माहिती घेतली पाहिजे. शेतकऱ्यांच्या समस्यांचे समाधान या कायद्याद्वारे केली जाणार आहे. येत्या काही दिवसांत शेतकऱ्यांची थकबाकी देखील दिली जाणार आहे.

पीएम मोदी म्हणाले, कृषी कायद्यावर कृषी सुधारणांनी शेतकऱ्यांच्या अडचणी दूर केल्या आहेत. पीक खरेदीच्या तीन दिवसानंतरच शेतकर्‍यांना त्याचा मोबदला दिला जातो. धुळ्यातील जितेंद्र भोईजी यांनी नव्या कृषी कायद्याचा वापर अगदी योग्य पद्धतीनं केला आहे. या शेतकऱ्याचं उदाहरण अन्य शेतकरी बांधवांनी डोळ्यासमोर ठेवायला हवं असंही मन की बातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. नवीन कृषी कायद्यामुळे शेतकऱ्यांचे दरवाजे कसे उघडले हे त्यांनी सांगितलं. कृषी कायद्याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या