नरेंद्र मोदींच्या सभेत मंडप कोसळला, 20 जण जखमी

पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या कार्यक्रमात मोठा अपघात झाला आहे.

पश्चिम बंगाल, 16 जुलै : पश्चिम बंगालमध्ये मोदींच्या कार्यक्रमात मोठा अपघात झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पश्चिम बंगालमधील मिद्नापूर येथे सभा सुर असताना तेथे बांधण्यात आलेल्या मंडपाचा काही भाग कोसळला. यात अनेक लोकं त्या मंडपाखाली सापडले. या अपघातामध्ये 20 लोक जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.मोदींचं भाषण सुरू असताना अचानक मंडप खाली पडला. त्यावेळ मोदी थांबले आणि त्यांच्या सुरक्षेत असलेल्या एसपीजी कमांडोला काय प्रकार घडला आहे ते पाहण्याचे आदेश दिले. त्यावर त्यांना मंडप पडल्याचं समजंल. जखमींना रुग्णालयात नेण्याची सोय करण्यात आली. पोलिसही घटनास्थळी दाखल झाले होते. सतत पाऊस पडत असल्याने मैदानातील माती ओली झाल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या सगळ्या प्रकारानंतर मोदी स्वतः मंडप पडून जखमी झालेल्या लोकांची भेट घेण्यासाठी रुग्णालयात पोहचले. यावेळी मोदींनी जखमी लोकांची विचारपूस केली. दरम्यान, हा मंडप पडला कसा याचा तपास पोलीस करत आहेत.

Trending Now