कराची, पाकिस्तान, 09 जुलै : पाकिस्तानमधल्या एका उमेदवारानं मतं मिळवण्यासाठी नामी शक्कल शोधली आहे. मत मागण्यासाठी अयाझ मेननं मोतीवाला या उमेदरवारानं चक्क गटारावर बसून स्वत:चे फोटो काढले आहेत. याआधी अयाझ यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, सांडपाण्यात बसूनही फोटो काढले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले. आतापर्यंत कोणत्याही उमेदवारानं अशा प्रकारची ‘स्टंटबाजी’ केली नसल्यानं अयाझ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. अयाझ एनए-२४३ मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. या मतदार संघात कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे.
कराची, पाकिस्तान, 09 जुलै : पाकिस्तानमधल्या एका उमेदवारानं मतं मिळवण्यासाठी नामी शक्कल शोधली आहे. मत मागण्यासाठी अयाझ मेननं मोतीवाला या उमेदरवारानं चक्क गटारावर बसून स्वत:चे फोटो काढले आहेत.
याआधी अयाझ यांनी कचऱ्याच्या ढिगाऱ्यात, सांडपाण्यात बसूनही फोटो काढले होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाले.
आतापर्यंत कोणत्याही उमेदवारानं अशा प्रकारची 'स्टंटबाजी' केली नसल्यानं अयाझ सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.
अयाझ एनए-२४३ मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत. या मतदार संघात कचऱ्याचा प्रश्न मोठा आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहे. शिवाय सांडपण्याचा निचराही योग्य होत नाही. त्यामुळे त्यांचे प्रश्न आपणच सोडवू शकतो असा विश्वास अयाझ यांना द्यायचा आहे.

असं केल्यानं लोक आपल्यावर विश्वास ठेवतील असा समज त्यांचा आहे म्हणूनच त्यांनी असे फोटो काढले आहेत.