JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / आता ‘हेल्मेट’ घातलं तरीही होणार दंड, बाईक चालवत असाल तर जाणून घ्या नवे नियम!

आता ‘हेल्मेट’ घातलं तरीही होणार दंड, बाईक चालवत असाल तर जाणून घ्या नवे नियम!

सुरक्षित आणि शिस्त असणारी वाहतूक असावी यासाठी केंद्र सरकार नियम करणार असून. बेशिस्त वाहनचालकांना दंड भरावा लागणार आहे.

0110

वाहतुकीला शिस्त यावी आणि प्रवास निर्धोक व्हावा यासाठी केंद्र सरकार नवे नियम तयार करत आहे. प्रवास करतांना विशिष्ट दर्जाचं आणि सुरक्षित असलेलं हेल्मेटच घालणं आता बंधनकारक होणार आहे.

जाहिरात
0210

बाईक चालवितांना हेल्मेट घालण्याची सक्ती आहे. मात्र ते हेल्मेट कुठल्या दर्जाचं असावं यावर मात्र फारसं नियंत्रण नसंत. त्यामुळे अनेकदा खर्च टाळण्यासाठी स्वस्त हेल्मेट वापरण्याकडे अनेकांचा कल असतो.

जाहिरात
0310

अशा निकृष्ट हेल्मेटमुळे अपघातात काहीच फायदा होत नाही. उलट त्यामुळे इजाच होण्याची शक्यता असते.

जाहिरात
0410

अपघातात जिवित हानी टाळण्यासाठी केंद्र सरकार नवा नियम करणार आहे. त्यामुळे लोकल ब्रॅण्डचं हेल्मेट घालून प्रवास केल्यास आता दंड होणार आहे.

जाहिरात
0510

रस्ते वाहतूक मंत्रालयाने त्यासंदर्भातला अध्यादेश काढला असून लोकांच्या सूचना आणि हरकती मागविल्या आहेत.

जाहिरात
0610

हेल्मेट हे ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) यांनीच प्रमाणीत केलेले असावेत असे नियम करण्यात येणार आहे. BIS मार्क असलेले हेल्मेट घातले नाही तर दंड होणार आहे.

जाहिरात
0710

लोकांच्या सूचना आल्यानंतर त्यांचा अभ्यास करून नियमावली तयार केली जाणार आहे. 1 मार्च 20121 पासून नवे नियम लागू होणार आहेत.

जाहिरात
0810

त्यामुळे आता बाईक चालवितांना डोक्यावर जुनं-पुराणं असलेलं फक्त नावालाच असलेलं हेल्मेट घालून आता चालणार नाही. नाही तर मोठा दंड भरावा लागणार आहे.

जाहिरात
0910

या आधीही सरकारने बाईक चालविणाऱ्यासाठी नवे नियम केले होते. गाडीवर मागे बसणाऱ्याला हँडलची व्यवस्था आता करावी लागणार आहे.

जाहिरात
1010

बाईक तयार करणाऱ्या कंपन्या आणि हेल्मेट उत्पादकांनाही आता आपलं उत्पादन दर्जेदार आणि जागतिक नियमांना अनुकूलच असावं याची काळजी घ्यावी लागणार आहे.

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या