इंदूर, 8 ऑगस्ट : मध्य प्रदेशच्या इंदूर जिल्ह्यातील महू येथे कावड यात्रेदरम्यान विजेच्या धक्क्याने एका कावड यात्रीचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण जखमी झाले आहेत. डीजेच्या तालावर नाचणार्या कावड यात्रीच्या हाताला 11 हजार किलोवॅटच्या विजेच्या तारेने स्पर्श केल्याने वाहनात विद्युत प्रवाह पसरला. वीजेचा झटका लागल्याने काही कावड यात्री वाहनावरुन खाली पडले. ही घटना आज सोमवारी सिमरोल पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. काय आहे संपूर्ण घटना - सिमरोल टीआय आरएस भदौरिया यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी एकच्या सुमारास झाला. त्या वेळी कावड यात्री नृत्य करत होते. विद्युत प्रवाह पसरल्यावर तरुणांची पडझड सुरू झाली. यात रौनक या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर शिवा, लोकेश आणि अतुल जखमी झाले. शिव याला इंदूरच्या एमवाय हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले आहे. तर लोकेश आणि अतुल यांच्यावर महू येथे उपचार सुरू आहेत. याप्रकरणी डीजे चालकावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हे कावड यात्री ओंकारेश्वर येथून जल घेऊन वापस येत होते. प्रत्यक्षदर्शीने दिली ही माहिती - येथील प्रत्यक्षदर्शी राकेश शिवराम यांनी सांगितले की, कावड यात्रेदरम्यान 2 डीजे जवळ उभे होते आणि मोठ्या आवाजात गाणी वाजवत होते. सगळेजण मस्तीत उड्या मारत होते. अचानक काही वेळाने डीजेवर चढलेली मुले पडू लागली. कोणाला काही समजण्यापूर्वीच त्यांना विजेचा धक्का बसला. सगळे घाबरले आणि इकडे तिकडे पळू लागले. त्याचवेळी दोन्ही डीजेवालेसुद्धा वाहनांसह पळून गेले.
गंभीर जखमींची नावे - लोकेश रामनारायण कोहली (वय 21, रा. करौंदिया) अतुल मूलचंद कोहली (वय - 24 रा. करौदिया) शिवा (वय - 20 रा. बगोदा) सिमरोलच्या मेंमदी गावात अपघात होण्यापूर्वी रविवारी रात्री सर्व कावड यात्री एक दिवस तलावाजवळ थांबले होते. यानंतर ही कावड यात्रा ओंकारेश्वर ते सिमरोल परिसरातील बगोडा या गावाकडे पाणी घेऊन निघाली होती. कावड यात्रेचे यांचे हे चौथे वर्ष होते. हेही वाचा - नदीच्या पुरात 14 पर्यटकांच्या कार वाहून गेल्या; अत्यंत धोकादायक रेस्क्यू ऑपरेशन, पाहा Video मागच्या आठवड्यात पश्चिम बंगालमध्येही घडली अशी घटना - पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्ये सोमवारी पिकअपला विजेचा धक्का लागून 10 कावडियांचा मृत्यू झाला होता तर 16 जण गंभीररीत्या भाजले होते. मेखलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धरला पुलावर हा अपघात झाला. पिकअपवर बसून 27 कावड यात्री जल्पेशच्या शिवमंदिरात जल अर्पण करण्यासाठी जात होत्या. पिकअपच्या मागे डीजे वाजत होता. जनरेटरच्या वायरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने करंट पिकअपपर्यंत पोहोचला. कावड यात्रींच्या कचाट्यात आला होता.