
भारतासाठी मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी पहिली महिला रिटा फारिया होती. 1966 मध्ये रिटाने हा किताब जिंकला होता.

आरती साहा ही पहिली महिला जलतरणपटू होती जिने इंग्लिश चॅनल ओलांडले. हा पराक्रम त्यांनी 1959 मध्ये केला होता.

महिला क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावण्याचा विक्रम मिताली राजच्या नावावर आहे. 2004 मध्ये तिने हा पराक्रम केला होता.

किरण बेदी या देशातील पहिल्या महिला IPS होत्या. हा विक्रम त्यांच्या नावावर 1972 साली नोंदवला गेला.

सानिया मिर्झा ही WTA विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला खेळाडू होती. 2005 मध्ये तिने हा विक्रम आपल्या नावावर केला होता.

एव्हरेस्ट जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेचे नाव बचेंद्री पाल होते. 1984 मध्ये त्यांनी हे शिखर जिंकले होते.

ऑलिम्पिक बॅडमिंटन स्पर्धेत पदक जिंकणारी सायना नेहवाल ही पहिली भारतीय महिला खेळाडू आहे. 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये तिने पदक जिंकले होते.

देशातील व्यावसायिक पायलट पदावर विराजमान झालेल्या पहिल्या महिला के. दुर्गा बॅनर्जी होत्या 1966 मध्ये त्यांनी पहिल्यांदा विमान उडवले.

डॉक्टरेट पदवी मिळवणाऱ्या आनंदीबाई जोशी या देशातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या.

देशात लायसन्स मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिलेचे नाव सरला ठकराल होते.

सैन्यात कमिशन मिळविणाऱ्या पहिल्या भारतीय महिला अधिकाऱ्याचे नाव होते प्रिया झिंगन. 1993 मध्ये त्या सैन्यात दाखल झाल्या.

अरुणिमा सिन्हा ही जगातील सर्वात उंच एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला होती.

पहिल्यांदाच देशाची कमान हाती घेतलेल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या. त्यांनी 1966 मध्ये पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली होती.

प्रतिभा देवी सिंह पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती झाल्या. 2007 ते 2012 पर्यंत त्यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणून काम केले.

देशात पहिल्यांदाच न्यायाधीशांच्या खुर्चीपर्यंत पोहोचलेल्या महिलेचं नाव आहे जस्टिस एम फातिमा बीवी.