JOIN US
मराठी बातम्या / देश / जत्रेत जाणं जीवावर बेतलं, राईड करताना झाला भयंकर अपघात, पाहा थरारक व्हिडीओ

जत्रेत जाणं जीवावर बेतलं, राईड करताना झाला भयंकर अपघात, पाहा थरारक व्हिडीओ

जत्रेदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आणि सावध करणारा आहे.

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

राजकोट, 21 ऑगस्ट : कोरोनामुळे जत्रा भरवण्यात येत नव्हत्या. मात्र यंदा मेळा आणि जत्रा सुरू झाल्याने लोकांचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्साहाला मात्र गालबोट लागलं. जत्रेदरम्यान एक भीषण दुर्घटना घडली. त्याचा व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ काळजाचा ठोका चुकवणारा आणि सावध करणारा आहे. जत्रेचा आनंद घेत असताना एक तरुणासोबत भीषण दुर्घटना घडली आहे. मोठ्या राईडरमधून तरुण पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना आणखी एक जत्रेतील भीषण दुर्घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ही धक्कादायक घटना गुजरातच्या सौरराष्ट्र परिसरात घडल्याची माहिती मिळाली आहे. राजकोट परिसरात जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं.

संबंधित बातम्या

तरुण मित्रांसोबत ब्रेक डान्स राईडमध्ये जत्रेत सहभागी झाला. मजा सुरू होती, जत्रेचा आनंद घेत होता. अचानक एक दुर्घटना घडली. या तरुणाच्या डोक्याला काहीतरी आपटलं आणि त्यातून रक्त येऊ लागलं. रक्तस्त्राव झाल्याने तरुण बेशुद्ध झाला. या तरुणाला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ब्रेक राईड तातडीनं बंद करण्यात आली. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. नेमका हा अपघात कशामुळे झाला याचं कारण अजून समोर आलं नाही.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या