नवी दिल्ली, 05 जुलै: देशात कोरोना व्हायरसची (Covid-19) दुसरी लाट आटोक्यात येत आहे. देशातील कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेच्या **(Coronavirus Pandemic Second Wave)**वेळी उपचारासाठी रूग्णालयात दाखल झालेल्या पुरुषांचे प्रमाण पहिल्या लाटेतील संख्येपेक्षा कमी होतं अशी माहिती समोर आली आहे. एका अभ्यासातून ही बाब उघड झाली आहे. ‘इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च’ मध्ये हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. जो भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR), ऑल इंडिया इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस **(AIIMS)**आणि नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) च्या तज्ज्ञांनी केला आहे. देशात कोरोना व्हायरसची दुसरी लाट (Covid-19 Second Wave)पहिल्या लाटेपेक्षा थोडी वेगळी होती हेही या अभ्यासातून समोर आले आहे. दुसर्या लाटेत, 20 वर्षांखालील लोक वगळता सर्व वयोगटात सर्वाधिक मृत्यूचे प्रमाण नोंदविण्यात आले. अधिक लोकांना श्वास घेण्यास त्रास, पूरक ऑक्सिजन आणि व्हेटिंलेटरची आवश्यकता होती. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात घट झाल्यानंतर 2021 च्या मार्चनंतर कोरोनाच्या प्रकरणांमध्ये देशात जबरदस्त वाढ झाली. या अभ्यासात रुग्णालयात दाखल आणि कोविड- 19 रुग्णांची लोकसांख्यिकीय, रोगविषयक, उपचार आणि निकालाची आकडेवारी संपूर्ण देशभरातील 41 रुग्णालयाच्या इलेक्ट्रॉनिक डेटा पोर्टलमध्ये नोंद करण्यात आली. यात म्हटलं आहे की, 01 सप्टेंबर, 2020 आणि 31 जानेवारी 2021 या कालावधीत आणि 01 फेब्रुवारीपासून 11 मे, 2021 यामध्ये या दोन लाटेदरम्यान दाखल झालेल्यांमध्ये मधल्या काळात दाखल झालेले रूग्ण होते. हेही वाचा- लेटरबॉम्बनंतर आमदार प्रताप सरनाईक यांची पहिली प्रतिक्रिया या अहवालात म्हटले आहे की या वर्षी 11 मे पर्यंत 18,961 व्यक्तींची नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी अनुक्रमे 12,059 आणि, 6,903 रुग्ण पहिल्या आणि दुसर्या लाटेच्या रूग्णांचे प्रतिनिधित्व करतात. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये सुमारे 70 टक्के रूग्ण 40 वर्षांवरील होते आणि पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेती पुरुषांची संख्या थोडी कमी होती.