JOIN US
मराठी बातम्या / देश / 'मिशन 2024'साठी नितीश दिल्लीत, राहुल गांधींना भेटल्यानंतर आता शरद पवारांकडे!

'मिशन 2024'साठी नितीश दिल्लीत, राहुल गांधींना भेटल्यानंतर आता शरद पवारांकडे!

2024 लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणनितीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) दिल्लीमध्ये आले आहेत. नितीश कुमार यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली.

जाहिरात

Nitish Kumar meet Rahul Gandhi

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

पटना, 5 सप्टेंबर : 2024 लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) रणनितीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) दिल्लीमध्ये आले आहेत. नितीश कुमार यांनी आज काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची भेट घेतली. राहुल गांधी यांचं सरकारी निवासस्थान 12 तुघलक लेनमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाली. नितीश कुमार यांच्यासोबत त्यांच्या सरकारमधले मंत्री अशोक चौधरी आणि संजय झा देखील उपस्थित होते. या बैठकीला काँग्रेसचे बिहारचे प्रभारी भक्त चरण दासही होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बैठक जवळपास 50 मिनीटं चालली. राहुल गांधींची भेट घेतल्यानंतर नितीश कुमार माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. इकडे त्यांची जेडीएसचे अध्यक्ष एच.डी.कुमारस्वामी यांच्यासोबतही बैठक केली. एच.डी कुमारस्वामी देवेगौडा यांचे पूत्र आहेत. जेडीयूच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार मंगळवारी इतर विरोधी पक्षांच्या नेत्यांनाही भेटणार आहेत. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता सीपीएमचे महासचिव सिताराम येचुरी यांच्याशी नितीश कुमार यांची भेट होईल. दोन्ही नेते सीपीएम कार्यालयात भेटणार आहेत. यानंतर नितीश कुमार दुपारी सव्वा बारा वाजता सीपीआय ऑफिसमध्ये पक्षाचे महासचिव डी.राजा यांच्यासोबत चर्चा करतील. दुपारी अडीच वाजता नितीश कुमार दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांची भेट घेतील. मंगळवारी संध्याकाळी चार वाजता नितीश कुमार इंडियन नॅशनल लोकदल (आयएनएलडी)चे अध्यक्ष ओम प्रकाश चौटाला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतील. याशिवाय नितीश कुमार यांची शरद पवार आणि समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांच्याशीही भेट होण्याची शक्यता आहे. नितीश कुमार आणि शरद पवार यांच्या भेटीची वेळ मात्र अजून निश्चित झालेली नाही. नितीश कुमार हे तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. नितीश कुमार यांच्यासोबत जेडीयूचे राष्ट्रीय अध्यक्ष राजीव रंजन उर्फ ललन सिंग, मंत्री अशोक चौधरी आणि मंत्री संजय झा हेदेखील दिल्लीमध्ये आले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या