JOIN US
मराठी बातम्या / देश / D Gang चा ठावठिकाणा सांगा, 90 लाख मिळवा! NIA दाखवला दाऊदचा लेटेस्ट Photo

D Gang चा ठावठिकाणा सांगा, 90 लाख मिळवा! NIA दाखवला दाऊदचा लेटेस्ट Photo

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या सहकाऱ्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने (NIA) फास आवळायला सुरूवात केली आहे.

जाहिरात

Dawood-Ibrahim-NIA

संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

मुंबई, 1 सप्टेंबर : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) आणि त्याच्या सहकाऱ्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयएने (NIA) फास आवळायला सुरूवात केली आहे. एनआयएने दाऊद आणि त्याच्या सहकाऱ्यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला 90 लाख रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. एनआयएने याबाबतची एक सर्क्युलर प्रसिद्ध केलं आहे. एनआयएच्या हाती दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांचा सध्याचा फोटो लागला आहे. एनआयएने पहिल्यांदाच दाऊद इब्राहिम आणि त्याच्या सहकाऱ्यांवर अधिकृतरित्या बक्षिसाची घोषणा केली आहे. एनआयएच्या सर्क्युलरनुसार दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा सांगणाऱ्याला 25 लाख रुपये, छोटा शकीलसाठी 20 लाख रुपये, टायगर मेमन, अनिस इब्राहिम आणि जावेद चिकनासाठी प्रत्येकी 15-15 लाख रुपयांचं इनाम देण्यात येईल. एनआयएने त्यांच्या सर्क्युलरमध्ये दाऊद, छोटा शकील, टायगर मेनन, अनिस इब्राहिम आणि जावेद चिकना यांचे फोटोही दिले आहेत. या सगळ्यांच्या चेहऱ्यामध्ये आता बराच बदल दिसून येत आहे. दाऊद इब्राहिमची गँग भारतात अवैध गोष्टी करत आहे, ज्यात विस्फोटक, ड्रग्स, अवैध हत्यारं आणि खोट्या नोटांच्या व्यवसायाचा समावेश आहे, असं एनआयएच्या सर्क्युलरमध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे. याशिवाय दाऊद इब्राहिम पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआय आणि दहशतवादी संघटनांच्या मदतीने भारतात दहशतवादी कारवाया करत आहे. दाऊद आणि त्याच्या हस्तकांविरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत, ज्याचा तपास यंत्रणा करत आहे. एनआयएच्या गुप्त रिपोर्टनुसार दाऊद गँगची लोक पाकिस्तान समर्थक दहशतवादी संघटनांना फंड देत आहेत. हा फंड मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरातून खंडणी, सट्टेबाजी, बिल्डरांना धमकावून आणि ड्रग्सचा व्यापर करून गोळा केला जात आहे.

दाऊद ग्लोबल दहशतवादी काही वर्षांपूर्वी दाऊद इब्राहिमला ग्लोबल दहशतवादी घोषित करण्यात आलं होतं. 2003 साली संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनेही दाऊदवर 25 लाख डॉलरच्या बक्षिसाची घोषणा केली होती. भारतीय तपास यंत्रणांना बऱ्याच गंभीर गुन्ह्यांमध्ये दाऊद इब्राहिम हवा आहे, यातलं सगळ्यात मोठं प्रकरण 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचं आहे. या बॉम्बस्फोटानंतरच दाऊद इब्राहिम देश सोडून फरार झाला होता. यावर्षी मे महिन्यामध्ये एनआयएने दाऊद इब्राहिमविरुद्ध 29 ठिकाणी छापेमारी केली, यात हाजी अली आणि माहीम दर्ग्याचे ट्रस्टी सुहैल खंडवानीशिवाय 1991 ब्लास्टचे आरोपी समीर हिंगोरा, सलीम फ्रुट, छोटा शकीलचा जवळचा नातेवाईक गुड्डू पठाण, दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि कयूम शेख यांच्या ठिकाणांवर छापे घालण्यात आले. सलीम फ्रुट सध्या न्यायालयिन कोठडीमध्ये आहे. या प्रकरणात एनआयएने इकबाल कासकरचीही अनेकवेळा चौकशी केली आहे. दाऊदने त्या लग्नासाठी मुंबईतून बनवला स्पेशल सूट, नागपाडा टू कराची व्हाया दुबई, Inside Story टायगर मेमनवर कट रचण्याचा आरोप एनआयएने डी गँगच्या ज्या लोकांवर बक्षीस ठेवलं आहे, त्यात टायगर मेमनवर 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांमध्ये सामील असण्याचा आणि कट रचल्याचा आरोप ठेवण्यात आला. टायगरचा भाऊ याकूब मेमनला 2015 साली याचप्रकणात दोषी आढळल्यानंतर फाशीची शिक्षा देण्यात आली. अनिस इब्राहिम दाऊदचा भाऊ आहे, जो सध्या दाऊदसोबत पाकिस्तानमध्ये राहत आहे. अनिस इब्राहिमवरही बॉम्बस्फोटाचा कट रचल्याचा आरोप आहे. जावेद पटेल उर्फ जावेद चिकना हादेखील दाऊदसोबतच राहत आहे. जावेद चिकनादेखील 1993 ब्लास्टचा आरोपी आहे. दाऊदचा अत्यंत जवळचा असलेला जावेद चिकना त्याचे काळे धंदे सांभाळतो. काही वर्षांपूर्वी गुजरातमध्ये भाजपच्या दोन नेत्यांची हत्या करण्यात आली, त्यात जावेद चिकनावर आरोप झाले होते. छोटा शकील 1988 साली डी गँगमध्ये सामील झाला होता, तेव्हापासून तो दाऊदचा उजवा हात मानला जातो. 1993 बॉम्बस्फोटामध्ये छोटा शकील मोस्ट वॉन्टेड आरोपी आहे. शकीलदेखील दाऊदसोबत पाकिस्तानमध्येच राहत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या