JOIN US
जाहिरात
मराठी बातम्या / फोटो गॅलरी / देश / PHOTOS: Vaccination जागरूकतेसाठी Sanjeevani उपक्रमाला सुरुवात; सोनू सूदही उपस्थित

PHOTOS: Vaccination जागरूकतेसाठी Sanjeevani उपक्रमाला सुरुवात; सोनू सूदही उपस्थित

नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं ‘संजीवनी- अ शॉट ऑफ लाइफ’ (Sanjeevani-a shot of life) या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे.

0110

नवी दिल्ली: नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं 'संजीवनी- अ शॉट ऑफ लाइफ' या उपक्रमाला सुरुवात केली आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत जागरूकता निर्माण केली जाणार आहे. तसेच संभाषणाला सुरुवात करून लोकांचा लसीकरणाविषयीचा भ्रम दूर केला जाणार आहे. तसेच वास्तविक स्थितीत बदल घडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

जाहिरात
0210

पंजाबमधील अटारी सीमेवर बुधवारी या उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यावेळी बॉलिवूड अभिनेता सोनू सूद आणि बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना उपस्थित होते. या कार्यक्रमाला अनेक भारतीय जवानही हजर होते.

जाहिरात
0310

अभिनेता सोनू सूदने या उपक्रमांतर्गत बुधवारी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात कोविड-19 ची पहिली लस घेतली आहे. सोनूने 'संजीवनी- अ शॉट ऑफ लाइफ' या उपक्रमांतर्गत लस घेऊन लसीकरणाबाबत जागरुकता निर्माण करण्याच्या अभिनयाला सुरुवात केली आहे.

जाहिरात
0410

सोनू सूदने मनात कसलीही भीती न बाळगता अपोलो हॉस्पिटलला भेट दिली आहे. तसेच जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोविड -19 लस घेतली आहे. सोनू सूदनं यावेळी सांगितलं की, “लस घेतल्यानंतर पुढील 30 मिनिटं तुम्ही डॉक्टरांबरोबर थांबायला हवं.'

जाहिरात
0510

जागतिक आरोग्य दिनाच्या दिवशी सुरू केलेल्या या अभियानाचं उद्दीष्टं कोविड -19 लसीकरणाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासोबत रोगप्रतिबंधक लसीकरण करणं का गरजेचं आहे, हे समजावून सांगणं आहे.

जाहिरात
0610

देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात राहणाऱ्या भारतीयांना 'शॉट ऑफ लाइफ' (लस) मिळावी यासाठी फेडरल बँक सीएसआर अभियान हाती घेतलं आहे.

जाहिरात
0710

बुधवारी पंजाबमधील अटारी सीमेवर औपचारीक कार्यक्रम घेऊन या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. यावेळी अभिनेता सोनू सूद सोबतचं बीएसएफचे डीजी राकेश अस्थाना उपस्थित होते.

जाहिरात
0810

यावेळी डीजी अस्थाना यांनी लशीबाबत नागरिकांमध्ये पसरलेल्या भ्रामक कल्पनांबाबत मोकळेपणाने संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'एक सैनिक म्हणून आम्हाला सीमेवर लढावं लागतं, त्यामुळे सर्व जवानांनी कोरोना लस घेतली आहे.' ते पुढं असंही म्हणाले की, 'देशाच्या शत्रुविरुद्धपेक्षा आपल्या आरोग्याच्या शत्रूशी लढणं जास्त महत्त्वाचं आहे.'

जाहिरात
0910

यावेळी लखविंदर सिंह वडाली यांनी मंत्रमुग्ध करणारं सुफी गाणं गायलं आहे.

जाहिरात
1010

यावेळी सोनू सूदनं म्हटलं की, 'संजीवनी हे लोकांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी आणि अधिकाधिक लसीकरण करण्यासाठी चालू केलेला एक उपक्रम आहे.'

जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

फोटो

महत्वाच्या बातम्या