JOIN US
मराठी बातम्या / देश / NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो, अखेर NEET परीक्षेचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार परीक्षा

NEET Exam 2021: विद्यार्थ्यांनो, अखेर NEET परीक्षेचा मुहूर्त ठरला; 'या' तारखेला होणार परीक्षा

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज NEET च्या UG परीक्षेची तारीख जाहीर केली आहे

जाहिरात
संबंधित व्हिडिओ
जाहिरात
News18 लोकमत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला फॉलो करा

नवी दिल्ली, 12 जुलै: गेल्या अनेक महिन्यांपासून जी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती त्या NEET च्या परीक्षेची तारीख आज अखेर जाहीर करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज NEET च्या UG परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. डॉक्टर होण्याची स्वप्न बघणाऱ्या विद्यार्थ्यांना NEET ही परीक्षा देणं गरजेचं असतं. मात्र कोरोनामुळे हे परीक्षा होऊ शकली नव्हती. मात्र आता या सर्व विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे तसंच या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा होणार आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून NEET (UG) 2021 ही परीक्षा 12 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. त्यासाठीची अप्लिकेशन प्रोसेस उद्या म्हणजेच 13 जुलै संध्याकाळी 5 वाजतापासून सुरु होणार आहे. विद्यार्थ्यांनी NEET च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज दाखल करायचा आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करून दिली आहे.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांसाठी विशेष सुविधा करण्यात आल्या आहेत. NEET 2021 परीक्षाकेंद्रांची संख्या वाढवण्यात आली आहे. तर परीक्षा घेण्यात येणाऱ्या शहरांची संख्या 155 वरून वाढवून 198 करण्यात आली आहे अशीही माहिती धर्मेंद्र प्रधान यांनी दिली आहे.

कोरोनाच्या नियमांचं पालन करण्यासोबतच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मास्कचं वाटप करण्यात येणार आहे. तसंच विद्यार्थ्यांच्या येण्याच्या आणि जाण्याच्या वेळेचे स्लॉट्स निश्चित करण्यात येणार आहेत. तसंच सर्व प्रकारचं रजिस्ट्रेशन हे शारीरिक संपर्क न होता असणार आहे. सोशल डिस्टंसिंगबाबतही संपूर्ण खबरदारी घेण्यात येणार आहे अशी माहिती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

फोटो

महत्वाच्या बातम्या